महत्वाच्या बातम्या

 तृतीयपंथी समुदायाच्या कल्याणकरीता नोंदणी अभियान व हेल्पलाईन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : राज्यातील तृतीयपंथीयाच्या कल्याणासाठी व त्यांच्या हक्काचे संरक्षण करण्याच्या उद्देशाने तृतीयपंथी हक्काचे संरक्षण आणि कल्याण मंडळ स्थापन करण्याबाबतचा मुद्दा तिस-या महिला धोरणामध्ये समाविष्ठ आहे.

तृतीयपंथी/ ट्रॅासजेंडर हा समाजातील एक दुर्लक्षित घटक असून भेदभाव, सापत्न वागणुकीमुळे समाजातील हा घटक विकास प्रक्रियेपासून दुर्लक्षित राहिला आहे. त्यामुळे या समाज घटकांचे शासनामार्फत मूलभुत अधिकारांचे संरक्षण करून त्यांना विकासाची समान संधी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. 

या समाज घटकांची सर्वागिण उन्नती व्हावी व त्यांना समाजाच्या विकास प्रवाहात आणले जावे, याकरिता गडचिरोली जिल्हयातील तृतीयपंथीयाच्या संस्था, तृतीयपंथीयांच्या मंडळे व तृतीयपंथीयांची नावे, शैक्षणिक पात्रता, पत्ता व भ्रमणध्वनीसह या कार्यालयात नोंदणी करण्याकरिता, तसेच तृतीयपंथी यांच्या समस्या व तक्रारीचे निवारण करण्याकरीता कार्यालयात हेल्पलाईन सुरू करण्यात आली असून हेल्पलाईन क्रमांक ०७१३२-२२२१९२ वर संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त डॉ. सचिन मडावी यांनी केले आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos