नाराज अंबाती रायुडूचा क्रिकेटला अलविदा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / मुंबई :
विश्वचषक स्पर्धेसाठी टीम इंडियात निवड न झालेल्या नाराज अंबाती रायुडूने धक्कादायकरित्या क्रिकेटला अलविदा केला आहे. अंबाती रायुडूने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला गुडबाय केला आहे केला आहे. निवृत्तीबाबत त्याने बीसीसीआयला लेखी कळवलं आहे. आयपीएलमध्ये धोनीच्या चेन्नईकडून खेळलेल्या रायुडूने जबरदस्त कामगिरी केली होतीच, शिवाया भारताकडून खेळतानाही  रायुडूने अनेक मॅचविनिंग खेळी केल्या होत्या. मात्र तरीही वर्ल्डकपसाठी त्याची भारतीय संघात निवड झाली नव्हती. याबाबतची नाराजी त्याने बोलून दाखवली होती. 
यंदाच्या विश्वचषकासाठी १५ जणांची भारतीय टीमची घोषणा केली, त्यावेळी रायडूला राखीव खेळाडू म्हणून टीममध्ये संधी देण्यात आली होती. मात्र विश्वचषकात शिखर धवन आणि  विजय शंकर या दोन खेळांडूंना दुखापत झाल्यानतंर बीसीसीआयने मयांक अग्रवाल आणि रिषभ पंत यांची निवड करत त्यांना इंग्लंडला बोलवले. याच कारणामुळे तो नाराज असल्याची चर्चा क्रिकेट जगतात रंगली होती. दरम्यान रायडूने निवृत्तीचे अधिकृत कारण अद्याप स्पष्ट केलेले नाही. पण तो आयपीएल खेळणार असल्याचे त्याने स्पष्ट केले आहे.

   Print


News - Rajy | Posted : 2019-07-03


Related Photos