बेडगाव येथे जिर्ण अवस्थेतील खांब कोसळून विद्युत सेवक जखमी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / कोरची
: तालुका मुख्यालयापासून ५ किमी अंतरावर असलेल्या बेडगाव येथे  जिर्ण अवस्थेतील खांब कोसळल्याने पडून विद्युत सेवक जखमी झाल्याची घटना आज २ जुलै  दुपारी २ वाजताच्या दरम्यान  घडली आहे. राजाराम उईके असे  जखमी विद्युत सेवकाचे नाव आहे. 
गावातील वीजपुरवठा खंडित झाल्याने   विद्युत सेवक राजाराम उईके हा खांबावर विज दुरूस्ती करिता चढला होता . मात्र विद्युत खांब जीर्ण अवस्थेत असल्याने   अचानक कोसळला .   विद्युत सेवक खांबासोबतच जमिनीवर कोसळला . यामुळे तो गंभीर जखमी झाला आहे. त्याला गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे. तालुक्यातील अनेक गावांमध्ये अनेक वर्षांपासून उभारलेले खांब आहेत.  हे खांब जीर्ण झाले असल्यामुळे केव्हाही कोसळण्याचा धोका आहे. यामुळे जीर्ण  खांब तातडीने बदलण्यात यावेत अशी मागणी नागरिकांनी केली आहे.  

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-07-02


Related Photos