अनुसुचित जमातीच्या उमेदवाराकरीता एम.पी.एस.सी. पूर्व प्रशिक्षण , २५ जुलै पर्यंत करा अर्ज


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली :
आदिवासी उमेदवाराकरीता कौशल्य विकास, रोजगार व उद्योजगता माहिती व मार्गदर्शन केंद्र गडचिरोलीच्या वतीने गडचिरोली जिल्हयातील अनुसुचित जमातीच्या उमेदवाराकरीता एम.पी.एस.सी. पुर्व प्रशिक्षण जिल्हा निवड समितीच्या विविध पदभर्ती बाबत तसेच IBPS, SSC च्या परीक्षा बाबत स्पर्धा पुर्व प्रशिक्षण कार्यक्रम  विनामुल्य राबविण्यात येत आहे. प्रशिक्षणासाठी २५ जुलै पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 
 सदर प्रशिक्षण घेऊ इच्छीणाऱ्या उमेदवारांकडे शालांत परीक्षा उत्तीर्ण  व रोजगार नोंदणी कार्ड (Employment Card) असणे आवश्यक आहे.  प्रशिक्षणाचा कालावधी साडे तीन महिने आहे.  प्रशिक्षणा दरम्यान दरमहा रुपये १ हजार विद्यावेतन दिले जाईल.  कार्यालयात अर्ज विनामुल्य उपलब्ध आहेत.  तसेच अर्ज  २५ जूलै   पर्यंत कार्यालयात सादर करावेत.  तदनंतर त्यांच्या मुलाखती अहेरी, भामरागड, मुलचेरा, एटापल्ली, सिरोंचा  तालुक्यातील उमेदवारानी   २६ जूलै  पंचायत समिती सभागृह , अहेरी येथे व गडचिरोली, चामोर्शी, धानोरा, आरमोरी, वडसा, कुरखेडा व कोरची तालुक्यातील उमेदवारांनी  ३० जूलै  रोजी आदिवासी उमेदवारांकरीता कौशल्य विकास, रोजगार व उद्योजगता माहिती व मार्गदर्शन केंद्र गडचिरोली येथे उपस्थित राहावे. अधिक माहितीसाठी कार्यालयाच्या 07132- 222135 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन कौशल्य विकास अधिकिारी योगेंद्र शेंडे यांनी केले आहे. 

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-07-02


Related Photos