लग्नाचे आमिष दाखवून आठ वर्षांपासून करायचा लैगिंक शोषण - बलात्काराचा गुन्हा दाखल


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली  : 
प्रेमात लग्नाचे आमिष दाखवून आठ वर्षांपासून शरीरसंबंध जोडणाऱ्या एका तरुणीला वाऱ्यावर सोडून आता दुसरीसोबत लग्न करण्याच्या तयारीत असलेल्या तरुणाविरुद्ध अजनी पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला. प्राजक्त प्रमोद धाईत वय ३१  चामोर्शी रोड, गडचिरोली असे आरोपीचे नाव आहे. सध्या तो नरेंद्रनगर चौकातील एम्प्रेस मिल कॉलनी, श्रीनगरमध्ये राहतो. तो आणि तक्रार करणारी तरुणी एकाच कंपनीत मार्केटिंगचे काम करायचे. त्याचे आणि तरुणीचे आठ वर्षांपूर्वी प्रेमसंबंध जुळले. त्यांनी लग्नाच्या आणाभाका घेतल्या. १६ ऑक्टोबर २०११ पासून त्यांच्यात अनेकदा शरीरसंबंध प्रस्थापित झाले. ८ जूनपर्यंत त्यांचे संबंध सुरळीत होते. अलीकडे लग्नाचा विषय काढताच आरोपी धाईत तिला टाळू लागला. त्यामुळे तिला संशय आला. तिने त्याच्या मित्रांकडे चौकशी केली असता, त्याने दुसऱ्याच एका तरुणीशी लग्न जुळविले. त्याने २० एप्रिलला साखरपुडाही उरकल्याची माहिती तिला मिळाली. त्यामुळे ८ जूनला त्यांच्यात कडाक्याचा वाद झाला. यावेळी त्याने लग्न तुझ्याशीच करणार आहे, असे सांगून वेळ मारून नेली. त्यानंतर लग्न कधी करणार, अशी विचारणा करताच तो विषय बदलवू लागला. तिने त्याच्यामागे तगादा लावल्यामुळे तो तिला टाळू लागला. तिने त्याला स्पष्ट सांग, असे म्हणताच त्याने रविवारी लग्नास स्पष्ट नकार दिला. परिणामी, तरुणीने अजनी ठाण्यात तक्रार नोंदवून त्याच्यावर बलात्काराचा आरोप लावला. पोलिसांनी तिच्या तक्रारीवरून धाईतविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला. पुढील तपास सुरू आहे.  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-07-02


Related Photos