प्रत्येकांनी वृक्षलागवड करून आपल्या धरती मातेचे ऋण फेडावे : जिल्हाधिकारी शेखर सिंह


- वृक्षलागवडीचा शुभारंभ 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली
: वाढत्या  वृक्षतोडीमुळे पर्यावरणााचे  संतुलन बिघडत असून याचा  परिणाम मानवी जिवनावरच नव्हे  तर सर्व प्राणीमात्रावर होत आहे.  त्यामुळे प्रत्येकांनी वृक्षलागवड  करून आपल्या धरती मातेचे  ऋण फेडावे , असे आवाहन  जिल्हाधिकारी शेखर सिंग यांनी  केले.
राज्यात ३३ कोटी  वृक्षलागवडीचा कार्यक्रम  राबविण्यात येत आहे. या  कार्यक्रमाचा शुभारंभ  १  जुलै रोजी करण्यात आला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून  जिल्हाधिकारी बोलत होते.  कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे  मुख्य कार्यकारी अधिकारी  डॉ.विजय राठोड, कार्य  आयोजना विभागाचे
उपवनसंरक्षक उमेश वर्मा,  सामाजिक वनिकरण विभागाचे  विभागीय वनाधिकारी मनोहर  गोखले, उपवनसंरक्षक डॉ.कुमारस्वामी आदी मान्यवर उपस्थित  होते. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राठोड यांनी वृक्षलागवडीमुळे पर्यावरणाचा होणारा ऱ्हास थांबविण्यास मदत होत असल्याचे सांगून प्रत्येकांनी किमान एक वृक्ष लावून त्याची  जोपासना करावी, असे आवाहन केले. कार्यक्रमानंतर वनखंड क्र.१६९ मध्ये मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करून वनमहोत्सवाची सुरवात  करण्यात आली.संचालन वनरक्षक सुनिल पेंदोरकर, तर आभार सहाय्यक वनसंरक्षक सोनल भडके यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी  सहाय्यक वनसंरक्षक मुक्ता  टेकाळे, सोनल भडके, डी.व्ही.कैलूके , व्ही.के.कोडापे या वनाधिकाऱ्यांसह गडचिरोली वनविभागाचे वनकर्मचारी, वनमजूरांनी सहकार्य केले.    Print


News - Gadchiroli | Posted : 2019-07-02


Related Photos