पुण्यात भिंत कोसळून ६ जण ठार


वृत्तसंस्था / पुणे :  कोंढवा येथे संरक्षक भिंत कोसळून १५ बांधकाम मजुरांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आंबेगाव बुद्रुक येथे  सिंहगड कॉलेज कॅम्पस येथे पाच घरांवर सीमाभिंत कोसळल्याची माहिती अग्निशमन दलाने दिली आहे. या अपघातात सहा जण ठार झाले आहेत. मृतांमध्ये दोन महिला आणि चार पुरुषांचा समावेश आहे. तर, तीन जण जखमी झाले आहेत. मृत नागरिक हे छत्तीसगडमधील रहिवासी असल्याचे समजते. 
रात्री ११.३० ते १२ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निहमान दलाने बचाव कार्यास सुरुवात केली असून आतापर्यंत नऊ लोकांना बाहेर काढल्याचे प्राथमिक वृत्त आहे. जखमींना भारती रूग्णालयात दाखल केले आहे. झाड पडून संरक्षक भिंत कोसळल्याचा प्राथमिक अंदाज अग्निशमन दलाकडून व्यक्त केला जात आहे. घटनास्थळी एनडीआरएफचे पथकही दाखल झाले आहे.   Print


News - Rajy | Posted : 2019-07-02


Related Photos