महत्वाच्या बातम्या

 पोभुर्णा आंदोलकाचा बहुतांश मागण्या शासन स्तरावर : उपविभागीय अधिकारी स्नेहल रहाटे


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / बल्लारपूर : पोभुर्णा येथे १७ ऑक्टोबर पासून जगन येलके यांच्या नेतृत्वात वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय पोंभूर्णा येथे ठिय्या आंदोलन चालू आहे. आंदोलनकर्त्यांना आपल्या मागण्या संदर्भात सर्व विभागाचे प्रतिनिधी समवेत बैठक घेऊन आंदोलकांचे समाधान करण्याचा प्रयत्न आंदोलनाच्या पूर्वीच महसूल प्रशासनाकडून  केला गेला. 

आंदोलनाच्या पहिल्या दिवसापासून आंदोलन स्थळी भेट देऊन कायदेशीर बाबीच लेखी उत्तर देण्याबाबत तहसीलदार पोंभूर्णा कदम व नायब तहसीलदार रामेश्वर बिडवई, उपविभागीय अधिकारी पोंभुर्णा स्नेहल रहाटे यांच्या मार्गदर्शनात प्रयत्न करीत आहेत. आंदोलकांच्या बहुतांश मागण्या शासन स्तरावरील आहेत व त्याबाबत कार्यवाही सुरू आहे. ही बाब समजवून सांगण्याचा सतत प्रयत्न महसूल प्रशासना कडून होत आहेत. काही  मागण्या या तांत्रिक बाबीमुळे लगेचच पूर्ण होऊ शकत नाहीत. 

ही बाब आंदोलकांना समजावून सांगण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून होताना दिसत आहे. परंतु आंदोलनकर्त्यांकडून कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. आंदोलकांसोबत सतत चर्चासत्र सुरू असून ही आंदोलनाच्या ७ वा दिवशी आंदोलक आक्रमक झालीत. उपविभागीय अधिकारी रहाटे यांना आंदोलकांनी घेराव घालून आक्रमक झालीत. तसेच मध्ये उपविभागीय पोलिस अधिकारी इंगळे यांना धक्का बुक्की झाली. त्या नंतर आंदोलकांनी आक्रमक होत वन विभागाच्या कार्यालयाची तोडफोड केली. इतके असून ही प्रशासन आंदोलन चर्चे च्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न करीत असून आंदोलक प्रतिसाद देताना दिसून येत नाही. प्रशासनाला वेठीस धरण्याचा प्रयत्न येथे दिसून येत आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos