नागपूर विभागात सरासरी ३३.८२ मिमी पाऊस


- नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यात सर्वाधिक ८२.२० मिमी अतिवृष्टी 
- नागपूर शहर व ग्रामीण भागात ७५.४०  मिमी पावसाची नोंद
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर :
नागपूर विभागात गेल्या चोवीस तासात सरासरी 33.82 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यात सर्वाधिक 82.20 मि.मी. पावसाची नोंद झाली. भंडारा जिल्ह्यातील भंडारा तालुक्यात 66.50 मि. मी., साकोली तालुक्यात 72.60 मिमी., तर गडचिरोली जिल्ह्यात भामरागड तालुक्यात 67.60 मिमी.  अतिवृष्टीची नोंद झाली.
 विभागात आज सकाळपर्यंत नोंदला गेलेला जिल्हानिहाय सरासरी पाऊस पुढीलप्रमाणे असून कंसातील आकडेवारी 1 जूनपासून आजवर झालेल्या पावसाची आहे.   नागपूर  55.32 (134.63), वर्धा 49.30 (107.58), भंडारा 45.07 (92.91), गडचिरोली 21.08 (112.96)  गोंदिया  18.52 (80.15)  तर सर्वात कमी  पाऊस चंद्रपूर जिल्ह्यात 13.60 (139.41) पडला आहे. सर्व आकडेवारी मिलीमीटर परिमाणात आहेत. नागपूर विभागात दिनांक 1 जून 2019 ते 1 जुलै 2019 पर्यत सरासरी 111.21 मिलीमीटर पाऊस पडला आहे.  Print


News - Nagpur | Posted : 2019-07-01


Related Photos