इस्त्रायलमधील मद्यनिर्मिती कंपनीने बीयरच्या बाटलीवर छापला राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा फोटो


वृत्तसंस्था / कोच्ची :  इस्त्रायलमधील एका मद्यनिर्मिती करणाऱ्या कंपनीने बीयरच्या बाटलीवर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा फोटो छापल्याने सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.केरळमधील महात्मा गांधी नॅशनल फाऊंडेशनने यावर नाराजी व्यक्त केली आहे. तसेच याप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांना पत्र लिहून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
‘गल्फ टुडे’ या वृतसंस्थेने याबाबत माहिती दिली आहे. त्यानुसार महात्मा गांधी नॅशनल फाऊंडेशनचे अध्यक्ष ए. बी. जोस यांनी काही दिवसांपूर्वी एक टिक टॉक व्हिडीओ बघितला. त्यात महात्मा गांधीचा फोटो असलेली बीयरची बाटली हातात घेऊन एक हिंदुस्थानी नागरिक केविलवाणा चेहरा करत असल्याचे दिसत होते. हे पाहताच जोस यांच्या भावना दुखावल्या. त्यांनी चौकशी करता तेफेन इण्डस्ट्रीज भागात मालका ब्रेवरी येथे बीयरची निर्मिती करण्यात येत असल्याचे त्यांना कळाले. तसेच या कंपनीतील बीयरच्या बाटल्यांवर जगप्रसिद्ध व्यक्तींचे फोटो छापण्यात येतात. यातीलच एका बाटलीवर गांधीजीचा फोटो लावण्यात आला होता. तेल अवीव मद्ये राहणाऱ्या अमिथ शोमनी याने तो फोटो डिझाईन केला आहे. यात गांधीजींना चश्मा, टी शर्ट घातलेले दाखवण्यात आले आहे. तसेच यात टी शर्टवर गांधीजींनी एक ओवरकोट घातल्याचे दिसत आहे. २०१५ साली देखील इंग्लडमधील कनेक्टिक्ट बेस्ड क्राप्ट बीयर कंपनीने गांधीवादी थीम वापरली होती. पण नंतर त्यावरही वाद झाल्याने कंपनीने जाहीर माफी मागितली होती.  Print


News - World | Posted : 2019-07-01


Related Photos