पावसाच्या आगमनाने जिल्ह्याच्या काही भागात पेरणीस सुरूवात, दमदार पावसाची प्रतीक्षाच!


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
मागील दोन दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली. यामुळे काही भागात शेतकऱ्यांनी पेरणीला सुरूवात केली आहे. तरीही जिल्ह्याच्या काही भागात दमदार पावसाची प्रतीक्षा असून पेरणी खोळंबलेली आहे.
जिल्ह्यातील शेतकरी खरीप हंगामाची तयारी केल्यानंतर पावसाच्या प्रतीक्षेत होता. जूनच्या पहिल्या आठवड्यातच संपूर्ण शेतीची मशागत आटोपली होती. १५ जूनपर्यंत पाउस आल्यास पऱ्हे टाकणी, तसेच कपाशी, सोयाबिन, तूर आदी पिकांची पेरणी करता येईल, अशी आशा शेतकऱ्यांना होती. मात्र संपूर्ण जून महिना संपत आला तरी पावसाचा पत्ता नव्हता. अखेर २८ जूनपासून विदर्भात पावसाने हजेरी लावली. काही भागात हलका तर काही भागात मध्यम पाउस झाल्याने शेतकऱ्यांनी पेरणीच्या कामांना सुरूवात केली आहे. जमिनीत अद्यापही पुरेसा ओलावा नाही. यामुळे काही शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. पुढील दोन दिवसात जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीस प्रारंभ केला आहे.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-07-01


Related Photos