आजपासून रिझर्व्ह बँकेने आर्थिक व्यवहारांसाठी काही नियम बदलले


वृत्तसंस्था /  नवी दिल्ली :  आज १ जुलै पासून रिझर्व्ह बँकेने आर्थिक व्यवहारांसाठी काही नियम बदलले आहेत.  तसेच गॅस सिलिंडरच्या किंमतीतही वाढ होणार आहे. त्याचप्रमाणे अल्प कालावधीसाठी असलेल्या मुदत ठेवींवरील व्याजदरही घटवण्यात येणार आहेत. त्यामुळे खातेधारकांना कमी व्याज मिळणार आहे.  नव्या महिन्यात बँकांचे आणि आर्थिक व्यवहारांसाठीच्या   बदललेल्या नियमांचा  परिणाम सर्वसामान्यांवरही परिणाम होणार आहे. 
केंद्र  सरकारने मोठा निर्णय घेत अल्प कालावधीसाठी असलेल्या मुदत ठेवींवरील व्याजदर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारने जुलै ते सप्टेंबर या तिमाहीसाठी हे दर ०.१०  टक्क्यांनी घटवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या कालावधीतील अल्प मुदत ठेवींवर कमी व्याज मिळणार आहे. डिजिटल आणि ऑनलाईन व्यवहारांना चालना देण्यासाठी रिझर्व्ह बँकेने आरटीजीएस आणि एनईएफटीचे शुल्क रद्द केले आहे. त्यामुळे १ जुलैपासून आरटीजीएस आणि एईएफटीसाठी कोणतेही शुल्क लागणार नाही. याआधी एनईएफटीसाठी १  ते ५  रुपयांचे शुल्क आकारण्यात येत होते. तर आरटीजीएससाठी ५ ते ५० रुपयांचे शुल्क आकारण्यात येत होते. त्याचप्रमाणे रिझर्व्ह बँकेने बचत खात्यांबाबतच्या काही नियमांमध्ये बदल केले आहेत. त्यामुळे खातेधारकांना सोयीसुविधा मिळणे आणि आर्थिक व्यवहार करणे अधिक सुलभ होणार आहे. त्याचप्रमाणे बचत खात्यांमध्ये मर्यादित रक्कम ठेवण्याचा निर्णयही रद्द करण्यात आला आहे. प्राथमिक बचत खात्यांमध्ये आता मर्यादित रक्कम ठेवणे बंधनकारक नाही. त्याचप्रमाणे या खात्यांसाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क द्यावे लागणार नाही. त्याचप्रमाणे १ जुलैपासून रेपोरेटवर आधारित गृहकर्ज स्टेट बँकेकडून देण्यात येणार आहेत. त्यामुळे एसबीआयचे गृहकर्ज आता रेपोरेटवर आधारित असेल.    Print


News - World | Posted : 2019-07-01


Related Photos