युट्युबवर आत्महत्येचा व्हीडीओ पाहून १२ वर्षीय मुलीची आत्महत्या , नागपुरातील घटना


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी /  नागपूर : 
एका १२ वर्षाच्या मुलीने युट्युबवर  आत्महत्येचा व्हीडीओ पाहून गळफास घेतल्याची घटना  शनिवारी सायंकाळी चार वाजता नागपूरमध्ये   घडली. शिखा राठोड असे तिचे नाव आहे. 
नागपूरमधील शिखा राठोड शनिवारी आपल्या वडिलांच्या मोबाईलमध्ये युट्युबवर आत्महत्येचा व्हीडीओ पाहत होती. नंतर तिने घराच्या खोलीत पंख्याला लटकून आत्महत्या केली. तिच्या लहान बहीणीने हे पाहिल्यावर लगेच आईला सांगितले. तिला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.  आत्महत्येच्या व्हीडीओबद्दल शिखाने आईलाही सांगितले. परंतु शिखा असे काही करेल असे  वाटले नव्हते. शिखाच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.  या प्रकरणी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.  Print


News - Nagpur | Posted : 2019-06-30


Related Photos