महत्वाच्या बातम्या

 केबल तुटले, इच्छुक निवडणुकीला मुकले : इंटरनेट सेवा विस्कळीत उमेदवारी अर्ज भरण्यास अडचन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / कोरची : ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक व पोटनिवडणुकीकरिता ऑनलाइन नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची अंतिम तारीख २० ऑक्टोबर होती. मात्र, केबल तुटल्यामुळे इंटरनेट सेवा विस्कळीत झाली. त्यामुळे अनेकांना उमदेवारी अर्ज भरताना अडचणी आल्या. आठ ग्रामपंचायतमध्ये सार्वत्रिक व सात ग्रामपंचायतमध्ये पोटनिवडणूक घेण्यात येणार आहे. परंतु कोरची तालुक्यातील विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत होता. शिवाय केवल तुटल्यामुळे बीएसएनएलची इंटरनेट कनेक्टिव्हिटी खंडित झाली. त्यामुळे अनेक उमेदवारांना नामनिर्देशनपत्र भरता आले नाही.

शुक्रवारी दुपारी १२ वाजेपासून मोबाइल नेटवर्क खंडित झाले. अनेक गावांतून इच्छुक ऑनलाइन नामनिर्देशनपत्र भरण्यासाठी आले होते. त्यांना नामनिर्देशनपत्र भरता आले नाही. नामनिर्देशनपत्र भरण्यासाठी मुदतवाढ द्यावी, अशी मागणी उमेदवारांनी तहसीलदारांकडे केली.

केबल केव्हा जोडणार?

गोंदिया जिल्ह्याच्या चिचगड- पिपरखारी गावाजवळ यापूर्वी खोदकामामुळे बीएसएनएलचे केबल तुटले होते. पुन्हा त्याच मार्गावर खोदकाम सुरु असल्यामुळे केबल तुटले. त्यामुळे इंटरनेट विस्कळीत झाले, असे बीएसएनएलच्या एका कन्राटी कर्मचाऱ्याने सांगितले. गडचिरोलीवरून बीएसएनएल कर्मचायांची टीम केवल जोडण्यासाठी शनिवारी येणार असल्याचेही सांगितले.





  Print






News - Gadchiroli




Related Photos