पोलीस विभागाने ५५ कृषी मेळाव्यांतून शेतकऱ्यांना दिली नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी /  गडचिरोली :
शेतकऱ्यांना नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती प्राप्त होऊन अधिक उत्पादन घेता यावे तसेच शेतीपुरक व्यवसायातून आर्थिक सुबत्ता साधता यावी, या  हेतूने पोलिस विभागाने ५५ मेळाव्यातून कृषी जागर केला. भामरागड व एटापल्ली  तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने कृषी  मेळाव्याचे आयोजन करण्यात आले  होते. तसेच काल २८ जून रोजी पोलीस मुख्यालय परिसरात कृषी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
कृषी मेळाव्याचे आयोजन  पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, अप्पर पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत, अप्पर पोलीस अधीक्षक मोहित कुमार गर्ग यांच्या संकल्पनेतून करण्यात आले.मेळाव्याला उपविभागीय कृषी अधिकारी प्रिती हिरळकर, तालुका कृषी अधिकारी जे.डी. कौटकर तालुका कृषी अधिकारी संजय  मेश्राम, तालुका कृषी अधिकारी  एस.जे. घनवट, बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापक अनिलकुमार श्रीवास्तव, मत्स्य विभागाचे सहायक आयुक्त प्रशांत वैद्य, जिल्हा दुग्धव्यवसाय अधिकारी सचिन यादव, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक सुनिलकुमार पठारे, सहाय्यक प्रकल्प अधिकारी सुधाकर गौरकार,  तंत्रज्ञान व्यवस्थापक हेमंतकुमार उंदिरवाडे आदी मान्यवर उपस्थित होते.
मेळाव्यात उपस्थित  मान्यवरांनी परंपरागत शेती न करता अत्याधुनिक पध्दतीने शेती कशी करायची, लागवडीच्या पध्दती, कृषी विभाग, दुग्ध
व्यवसाय, मत्स्य व्यवसाय विभाग,  आदिवासी विकास विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली. कृषी कर्ज व पिक विमा योजनांची माहिती याबाबत
मार्गदर्शन केले. कार्यक्रमाअंती  उपस्थित शेतकऱ्यांना बि - बियाण्यांचे विनामुल्य वाटप करण्यात आले. पोलीस प्रशासनाद्वारे आयोजीत कृषी मेळाव्याच्या माध्यमातुन कृषी विषयाचे ज्ञान शिकायला मिळाल्याचा अभिप्राय जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी व्यक्त केला.   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-06-30


Related Photos