निसंतान दाम्पत्यास मुलंबाळं होण्याकरीता औषधोपचार करणाऱ्या बोगस डॉक्टरला कढोली येथे अटक


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / कुरखेडा : 
 कोणतेही वैद्यकीय प्रमाणपत्र नसताना निसंतान दाम्पत्यास मुलंबाळं होण्याकरीता औषधोपचार करणाऱ्या बोगस डॉक्टरला कढोली येथील त्याच्या दवाखान्यात आज २९ जून रोजी कुरखेडा पोलीसांनी अटक केली.
जगदीश शंकर खंडारकर रा.वैरागड ता.आरमोरी असे अटक झालेल्या बोगस डॉक्टरचे नाव आहे. जगदीश खंडारकर हा मागील काही दिवसांपासून कढोली येथील एका खासगी भाड्याच्या इमारतीत दवाखाना थाटून तेथे मुलंबाळं नसलेल्या दाम्पत्यावर औषधोपचार करीत होता. परंतु त्याच्याकडे कोणतेही वैद्यकीय प्रमाणपत्र नाही, अशी गोपनीय माहिती कुरखेडा पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिस निरीक्षक प्रशांत रेळेकर, हवालदार अमृत मेहर यांनी  खंडारकर याच्या दवाखान्यावर धाड टाकली व रुग्णांवर अवैधरित्या औषधोपचार करताना अटक केली. त्याच्या विरोधात महाराष्ट्र वैद्यकीय व्यवसाय अधिनियम १९६१ कलम ३३,३७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास  ठाणेदार सुनिल उईके यांच्या मार्गदर्शनात कुरखेडा पोलीस करीत आहेत.   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-06-29


Related Photos