महत्वाच्या बातम्या

 आष्टी येथे प्रमोद महाजन कौशल्य विकास केंद्राचे ऑनलाइन उद्घाटन संपन्न 


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / आष्टी : कौशल्य, उद्योजक, नाविन्यता आणि रोजगार विभाग महाराष्ट्र शासनाच्या वतीने १९ ऑक्टोबर २०२३  रोजी ठीक सायंकाळी ४ वाजता ऑनलाइन पद्धतीने प्रमोद महाजन कौशल्य विकास केंद्राच्या उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, देवेंद्र फडणवीस, ना. मंगलप्रभात लोढा यांच्या प्रमुख उपस्थित झाले. 

यावेळी आष्टी येथील सरपंच बेबी बुरांडे, गटविकास अधिकारी सागर पाटील, विस्तार अधिकारी बोरकुटे, जिल्हा कौशल्य विकास अधिकारी चितमवर, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. राजकुमार मुसणे, दिवाकर कुंदोजवार, संचालक अतुल फुलझेले, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक व ग्रामस्थ उपस्थित होते. 

महाराष्ट्राच्या ३६ जिल्ह्यातील विविध  ५११ प्रमोद महाजन कौशल्य विकास केंद्र यांचे उद्घाटन ऑनलाइन पद्धतीने संपन्न झाले. प्रमोद महाजन कौशल्य विकास केंद्र अंतर्गत राबविणाऱ्या स्कील डेव्हलपमेंट कोर्सची महिती उपस्थितांना देण्यात आली.





  Print






News - Gadchiroli




Related Photos