पोलीस कर्मचाऱ्याची ठाण्यातच गळफास घेऊन आत्महत्या


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर :
एका पोलीस कर्मचाऱ्याने तो ज्या पोलीस ठाण्यात कामाला होता तिथेच गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेने वरोरा पोलीस स्टेशन परिसरात खळबळ उडाली आहे. सुरेश बाबोळे (५०) असं या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असून त्यांनी पहाटेच्या सुमारास आत्महत्या केल्याचं सांगण्यात आलं आहे.
बाबोळे यांनी वरोरा पोलीस ठाण्यातील गुन्हे शाखेच्या कार्यालयात आत्महत्या केली. त्यांनी हे टोकाचे पाऊल का उचलले याची माहिती अजून मिळू शकलेली नाहीये. गेल्या काही दिवसांपासून ते कामावर येत नव्हते. शुक्रवारी ते अचानक पोलीस स्टेशनला हजर झाले आणि त्यांनी इथे येऊन जीव दिला.  Print


News - Chandrapur | Posted : 2019-06-29


Related Photos