जि. प. च्या आरोग्य विभागामार्फत काढण्यात आलेल्या ई - निविदा रद्द करा


- आरोग्य समिती सभापती अजय कंकडालवार यांच्या सुचना
- जि.प. उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांनी घेतला आरोग्य विभागाचा आढावा
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी बैठकीत निर्णय न घेता ई - निविदा प्रकाशित केल्या. यामुळे सदर निविदा रद्द करण्यात याव्या, अशा सुचना जि.प. उपाध्यक्ष तथा आरोग्य समिती सभापती अजय कंकडालवार यांनी दिल्या आहेत. आरोग्य समितीच्या सदस्यांनी ई - निविदा परस्पर प्रकाशित केल्याचा मुद्दा उपस्थित केला होता. सबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली.
जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा आरोग्य समितीचे सभापती अजय कंकडालवार यांनी काल २८ जून रोजी आरोग्य विभागाचा आढावा घेतला. यावेळी आरोग्य समितीचे सदस्य तथा अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
सभेत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. विविध प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रांच्या दुरूस्तीचे तसेच अन्य कामे बैठकीमध्ये न ठेवता ई निविदा प्रकाशित करण्यात आल्या. यामुळे या निविदा रद्द करण्यात याव्या याबाबत चर्चा करण्यात आली. तसेच जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रामधील सोयी - सुविधा, औषधसाठा, कर्मचारी, वैद्यकीय अधिकारी, पावसाळ्याच्या दिवसातील नियोजन आदी बाबींवर चर्चा करण्यात आली.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-06-29


Related Photos