सायकलवारीत अपघाती मृत्यू झालेल्या प्रेम चे आई - वडील करणार देहदान


वृत्तसंस्था / नाशिक :   सायकलवारीत गेलेल्या  प्रेम सचिन नाफडे या नऊ वर्षांच्या मुलाचा ट्रकच्या धडकेत आज सकाळी मृत्यू झाला.  प्रेमच्या मृत्यूमुळे त्याच्या आई वडिलांवर दुःखाचे डोंगर कोसळले आहे. अशाही परिस्थितीत प्रेमच्या आई - वडिलांनी त्याचे देह दान करण्याचे ठरवले आहे. यामुळे त्यांच्या निर्णयाला सर्वच स्तरातून सलाम केला जात आहे. देहदान केले जाणार असल्याची माहिती सायकल वारीच्या आयोजकांनी  दिली.
प्रेमचा अपघाती मृत्यू झाल्याने त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सिन्नर येथील शासकीय रूग्णालयात पाठवण्यात आला आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर देहदान करण्याची इच्छा प्रेमच्या आई वडिलांनी व्यक्त केली आहे. दुः 
नाशिकमध्ये सायकलवारीला आज सकाळीच सुरूवात झाली. मात्र सुरूवात झाल्या झाल्या काही वेळातच प्रेम सचिन नाफडे या विद्यार्थ्याला ट्रकने चिरडले आणि त्याचा मृत्यू झाला. प्रेम नाफडे हा नाशिक येथील रायन इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकत होता. सायकलवारी जेव्हा सिन्नर बायपासजवळ आली तो सायकलवारीचा टी पॉईंट होता. 
टी पॉईंटला चहा-नाश्ता झाल्यावर प्रेम रस्त्यावर येऊन उभा राहिला. प्रेम दुसऱ्या लेनवर उभा होता, त्याचवेळी तिथे एक बंद ट्रक उभा होता. या ट्रकचा चालक दारूच्या नशेत होता त्याने जोरात हॉर्न वाजवला. ज्यामुळे प्रेम घाबरला त्याला काय करावे ते सुचले नाही. तेवढ्यात ट्रक चालकाने गिअर टाकला. ९ वर्षांचा मुलगा त्या आवाजाला घाबरला, मात्र ट्रक चालकाने ट्रक बाजूला न घेता या मुलाच्या अंगावर घातला. या प्रकारामुळे ९ वर्षांच्या प्रेमचा जागीच चिरडून मृत्यू झाला.    Print


News - Rajy | Posted : 2019-06-28


Related Photos