पावसाची हुलकावणी, विदर्भातील शेतकरी चिंतातूर!


- हवामान विभागाचे वेगवेगळे अंदाज
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली
: मागील काही दिवसांपासून हवामान विभागाचे वेगवेगळे अंदाज येत असून मान्सून उशिरा का होईना दाखल झाला असतानाही विदर्भात ढग दाटून येतात मात्र पाउस हुलकावणी देत आहे. यामुळे विदर्भातील शेतकरी चिंतातूर झाला आहे.
विदर्भात धान तसेच कापूस, तूर, सोयाबिन आणि अन्य पिके घेतली जातात. साधारणतः जूनच्या पहिल्या आठवड्यापासून १५ ते २० जूनच्या दरम्यान पेरणीची कामे केली जातात. मात्र मान्सून शेतकऱ्यांनी मशागतीची कामे करून पावसाची  प्रतीक्षा सुरू केली. पावसाची प्रतीक्षा अद्यापही संपली नसून ढग दाटून येतात मात्र पाउस येतच नाही, अशी परिस्थिती आहे. आजही प्रचंड प्रमाणात उकाडा सहन करावा लागत आहे. आज मुंबई, पुणे, कोकण विभागात पावसाला सुरूवात झाली आहे. मुंबईत प्रचंड पाउस कोसळत आहे. मात्र विदर्भातील शेतकरी पावसाअभावी चिंतातूर झाला आहे.
अनेक शेतकर्यांनी बियाणे, खते, किटकनाशके खरेदी करून ठेवली आहेत. संपूर्ण मशागत केली आहे. केवळ पावसाच्या प्रतीक्षेत शेतकरी आहे. काही भागातील शेतकऱ्यांनी अल्पशः पावसामुळे पेरणीसुद्धा केली. मात्र आता त्यांनासुद्धा दुबार पेरणी करावी लागण्याची शक्यता आहे. पावसाबाबत   हवामान विभागाचे वेगवेगळे अंदाज येत असून जून महिना संपत असतानाही पावसाने डोळे वटारले असल्यामुळे शेतकरी दुष्काळाच्या छायेत दिसून येत आहे.  

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-06-28


Related Photos