महत्वाच्या बातम्या

 बालकांचे अधिकार व समस्या संदर्भात शाळेत मुला-मुलींना मार्गदर्शन करून जाणीव जागृती निर्माण करणे गरजेचे : खासदार रामदास तडस


- देवळी शहरात बालविवाह मुक्त अभियान अंतर्गत रॅलीचे आयोजन.

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / देवळी : नोबेल पुरस्कार विजेते कैलास सत्यार्थि यांनी चिल्ड्रन फाऊंडेशन च्या माध्यमातुन भारतातील बालकाच्या हक्कासाठी बालपन वाचवा चळवळ सुरु केली, यामाध्यमातुन देशात लढा सुरु आहे. परंतु हे एका व्यक्तीचे काम नसुन सर्व समाजातातील नागरिकांनी व शिक्षकांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे, बालविवाहाचा प्रश्न, बालकांचे अधिकार आणि हक्क, लैंगिक अत्याचार, शारीरिक शोषण, मोबाईलचा गैरवापर, बालकामगार प्रश्न इत्यादी विषयावर शाळेत मुला-मुलींना मार्गदर्शन करून जाणीव जागृती निर्माण करणे गरजेचे आहे. 

बालविवाहाला कायदयांने बंदी असुन सुध्दा अनेक समाजामध्ये बालविवाह सातत्याने घडत आहे. यावर आवर घालने जेवढे प्रशासनाचे काम आहे, तेवढेच समाजातील नागरिकांचे सुध्दा कर्तव्य आहे. समाजात घडणा-या घटना, स्त्रीया आणि मुलींवर होणारे अन्याय अत्याचार, त्यांना थांबविण्यासाठी आपण कायद्याचा आधार घेऊन स्वतःचे रक्षण केले पाहिजे. बालपणात होणारे विवाह टाळण्यासाठी आपल्या समाजात बालविवाह होणार नाही याकरिता प्रयत्न केले पाहिजे असे प्रतिपादन खासदार रामदास तडस यांनी यावेळी केले.

वर्धा जिल्हात राबविण्यात येणाऱ्या कैलास सत्यार्थि चिल्ड्रन फाऊंडेशन यांच्या मार्गदर्शनाने व ग्रामीण समस्या मुक्ती ट्रस्टच्या वतीने बालविवाह मुक्त अभियाना अंतर्गत १६ ऑक्टोबर २०२३ रोज सोमवार ला जिल्हा समन्वयक संतोष घुगे यांच्या मार्गदर्शनात जाणीव जागृती व्हावी या उद्देशाने बालविवाह मुक्त अभियान राबविण्यात आले. सकाळी साडेदहा वाजता जनता विद्यालय येथून रॅलीला सुरुवात करण्यात आली. यावेळेस खासदार रामदास तडस यांनी रॅलीला हिरवी झेंडी दाखविण्यात आली. यावेळेस डॉक्टर नरेंद्र मदनकर माजी उपाध्यक्ष नगर परिषद देवळी, रवि कारोटकर शहर अध्यक्ष भाजप, स्वप्नील कामडी तथा सामाजिक क्षेत्रातील प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते.

या रॅलीत शहरातील जनता विद्यालय तथा ज्युनिअर कॉलेज, यशवंत कन्या शाळा, सृजन विद्यालय, नगर परिषद विद्यालय, एस.एन.जे महाविद्यालय तथा इतर शाळेतील विद्यार्थ्यां तथा शिक्षक सहभागी होऊन बालविवाह थाबंवा, बालविवाह मुक्त जिल्हा, तथा बालविवाह उपक्रमांतर्गत घोषवाक्य देऊन शहरातील लोकांचे लक्ष वेधण्यात आले. 

पोलीस स्टेशन सामोर सर्व विद्यालयातील विद्यार्थ्यांचे तथा शिक्षकाचे स्वागत देवळीचे पोलीस निरीक्षक भानुदास पिदूरकर यांनी केले. यावेळेस पोलीसांकडून बंदोबस्त ठेवून रॅलीचे स्वागत ठिकाणावर करण्यात आले. ही रॅली विदर्भ केसरी खासदार रामदास तडस इनडोअर स्टेडियम येथे समारोप करण्यात आला. यावेळेस खासदार रामदास तडस, पोलीस निरीक्षक भानुदास पिदूरकर डॉ. नरेंद्र मदनकर, नगर परिषद कॉलेजच्या कपुर मॅडम, जनता ज्यु. कॉलेजचे धर्मेश झाडे, प्राध्यापक पंकज चोरे, तथा सृजन कॉलेज, जनता कॉलेज यशवंत कन्या शाळेतील तथा देवळीतील सर्व कॉलेज तथा विद्यालयाचे शिक्षक उपस्थित होते. यावेळेस विद्यार्थी बांधव मोठ्याप्रमाणात उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन विजय पचारे तथ प्रास्ताविक प्राध्यापक सचिन सावरकर यांनी केले आभार सि एस डबलु यांनी मानले.





  Print






News - Wardha




Related Photos