मुख्याधिकारी आणि कर्मचारी रजेवर, आरमोरी नगरपरीषद ऑक्सिजनवर!


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / आरमोरी : 
नगराचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून   शासनाच्या वतीने नगर परिषदेला मोठ्या प्रमाणात निधी दिला जातो.   रस्ते , पाणी, स्वछता याहुन अधिक विकासकामे व नागरिक तसेच विद्यार्थ्यांची कामे केली जातात. परंतु  आरमोरी नगर परिषदेचे मुख्यधिकारी  १७  जुन पासुन वैद्यकीय रजेवर आहेत. त्यातच आणखी भर म्हणजे अनेक सवर्गातील  कर्मचारी सुद्धा रजेवर गेल्याने नगर परिषदेचा कारभार ऑक्सिजनवर आला आहे. यामुळे अनेक नागरिकांच्या अडचणी वाढल्या आहेत. 
 २६ जून  रोजी नगर परिषदे मध्ये फेरफटका मारला असता नगर परिषदेचे कर्मचारी बंडावार फक्त नगर परिषदे मध्ये उपस्थित होते.  त्यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार असल्यामुळे गुरुवार ,शुक्रवार धानोरा येथे राहतात. उर्वरित  दिवस आरमोरी येथे राहतात. आता सध्या शाळकरी मुलांना शिक्षणासाठी विविध दाखल्याची गरज भासत आहे. मात्र  येथील नगरपरीषद कार्यालयात कर्मचारीच नसल्यामुळे   मोठी अडचन निमाण झाली आहे. सध्या नगरपरीषद चा प्रभार तहसीलदार दाहाट याच्याकडे आहे.  परतु तेही आरमोरी नगरपरीषदकडे फिरकत नसल्याने नगर परिषद   ऑक्सिजनवर आहे.
  नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सतिश चौधरी यांच्याशी संपर्क केला असता,  माझी प्रकृती ठिक नसल्यामुळे मी  वैद्यकीय रजेवर आहे व प्रभार आरमोरीचे तहसिलदार डहाट  यांच्याकडे देण्यात आला आहे . मात्र ते सुद्धा काम असल्यामुळे येऊ शकले नाही असे चौधरी यांनी सांगितले.   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-06-28


Related Photos