महत्वाच्या बातम्या

 आजचे दिनविशेष


१९ ऑक्टोबर महत्वाच्या घटना

१२१६ : इंग्लंडचा राजा जॉन मृत्यूमुखी पडल्यामुळे त्याचा ९ वर्षाचा मुलगा हेन्‍री हा राजेपदी आरुढ झाला.

१८१२ : नेपोलियन बोनापार्टने मॉस्कोच्या सीमेवरुन माघार घेतली.

१९३३ : जर्मनी लीग ऑफ नेशन्स (League of Nations) मधून बाहेर पडले.

१९३५ : इथिओपियावर आक्रमण केल्यामुळे राष्ट्रसंघाने (League of Nations) इटलीवर आर्थिक निर्बंध घातले.

१९४४ : दुसरे महायुद्ध – अमेरिकन फौजा फिलीपाइन्सला पोचल्या.

१९७० : भारतीय बनावटीचे पहिले मिग लढाऊ विमान हवाईदलाकडे सुपुर्द.

१९९३ : पुण्याजवळील महारेडिओ दुर्बिण (GMRT) प्रकल्पाचे जनक आणि शास्त्रज्ञ प्रा. गोविंद स्वरुप यांना सर सी. व्ही. रामन पदक जाहीर.

१९९४ : रुद्रवीणावादक उस्ताद असद अली खाँ यांना मध्य प्रदेश सरकारचा तानसेन पुरस्कार जाहीर.

२००० : पार्श्वगायिका आशा भोसले यांना राज्यशासनाचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान.

२००५ : मानवतेविरुद्ध गुन्ह्यांसाठी सद्दाम हुसेन यांच्याविरुद्ध खटला सुरू झाला.

१९ ऑक्टोबर जन्म

१९०२ : कथालेखक दिवाकर कृष्ण केळकर तथा दिवाकर कृष्ण यांचा जन्म. (मृत्यू: ३१ मे १९७३ – हैदराबाद, आंध्र प्रदेश)

१९१० : तार्‍यांचे आयुर्मान व त्यांचा शेवट यावरील संशोधनासाठी १९८३ मधे नोबेल पारितोषिक मिळालेले भारतीय- अमेरिकन खगोल वैज्ञानिक सुब्रमण्यन चंद्रशेखर यांचा जन्म. (मृत्यू: २१ ऑगस्ट १९९५)

१९२० : कृतीशील विचारवंत आणि तत्त्वज्ञ पांडुरंगशास्त्री आठवले यांचा जन्म. (मृत्यू: २५ ऑक्टोबर २००३)

१९२५ : वनस्पतीशास्त्रज्ञ व देवराई अभ्यासक डॉ. वामन दत्तात्रय तथा वा. द. वर्तक यांचा जन्म. (मृत्यू: १७ एप्रिल २००१)

१९३६ : गीतकार शांताराम नांदगावकर यांचा जन्म. (मृत्यू: ११ जुलै २००९)

१९५४ : रंगभूमी, चित्रपट व दूरचित्रवाणीवरील अभिनेत्री, लेखिका, सामाजिक कार्यकर्त्या प्रिया तेंडुलकर यांचा जन्म. (मृत्यू: १९ सप्टेंबर २००२)

१९६१ : अभिनेते अजय सिंग देओल ऊर्फ सनी देओल यांचा जन्म.

१९ ऑक्टोबर मृत्यू

१२१६ : इंग्लंडचा राजा जॉन यांचे निधन. (जन्म: २४ डिसेंबर ११६६)

१९३४ : ओडिया लेखक, संपादक व समाजसुधारक विश्वनाथ कार यांचे निधन. (जन्म: २४ डिसेंबर १८६४)

१९३७ : नोबेल पारितोषिक विजेते ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ अर्नेस्ट रुदरफोर्ड यांचे निधन. (जन्म: ३० ऑगस्ट १८७१)

१९८६ : मोझांबिक देशाचे पहिले राष्ट्रपती समोरा महेल यांचे निधन. (जन्म: २९ सप्टेंबर १९३३)

१९५० : पुणे विद्यार्थी गृहाचे एक संस्थापक विष्णू गंगाधर तथा दादासाहेब केतकर यांचे निधन. (जन्म: ९ एप्रिल १८८७)

१९९५ : बाल कलाकार व अभिनेत्री सलमा बेग ऊर्फ बेबी नाझ यांचे निधन.

२००३ : बोत्सिया व हर्जेगोविना देशाचे पहिले अध्यक्ष अलिजा इझेटबेगोविच यांचे निधन. (जन्म: ८ ऑगस्ट १९२५)

२०११ : भारतीय लेखक कक्कणदन यांचे निधन. (जन्म: २३ एप्रिल १९३५)





  Print






News - todayspecialdays




Related Photos