महत्वाच्या बातम्या

 सिंदेवाही : विनामूल्य मोतीबिंदू डोळे तपासणी शिबिरांत २३० रुग्णाची  शस्त्रकियेसाठी निवड


- रत्नापुर येथील श्री.गुरुदेव नवयुवक दुर्गा उत्सव मंडळाचे उपक्रम

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / सिंदेवाही : चंद्रपूर जिल्ह्यात विनामूल्य मोतीबिंदू डोळे तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर तथा रक्तदान शिबिरांची एक लोक चळवळ उभी करणारे व्यक्तिमत्व म्हणून माजी जि.प.सदस्य तथा सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती सिंदेवाही रमाकांत लोधे आणि गुरुदेव नवयुवक दुर्गा उत्सव मंडळाचे नाव घेतले जाते. मागील १९वर्षांपासून अखंडितपणे मोतीबिंदू शिबिरांच्या माध्यमातून अनेक रुग्णांना नवी दृष्टी देण्याचे महान कार्य गुरुदेव नवयुवक दुर्गा उत्सव मंडळ रत्नापुर करीत असून यावर्षी २३० रुग्णाची  शस्त्रकियेकरिता निवड करण्यात आली आहे.

सिंदेवाही तालुक्यातील रत्नापुर येथे १९ वर्षोंपासून गुरुदेव नवयुवक दुर्गा उत्सव मंडळ कार्यरत आहे. या मंडळाच्या वतीने नवरात्र उत्सवात  दुर्गा मातेची स्थापना करून दरवर्षी देख्याव्यची प्रतिकृती तयार करून भाविकाना दर्शनासाठी खुले केले जाते. यावर्षी भगवान श्रीकृष्णचा चतुर्भुज विराट रूप देखावा तयार केला आहे. हा देखावा पाहण्यासाठी खुप दूर-दुरुन भाविक मंडळी येत आहेत. सोबतच या मंडळाने विविध सामाजिक उपक्रम, कार्यक्रम राबवित असतात. 

यावर्षी लायन्स क्लब चंद्रपूरचे  संस्थापक सदस्य, माजी अध्यक्ष स्वर्गीय सुरेश घनश्याम राणे यांच्या स्मृति प्रीत्यर्थ, सेवाग्राम मेडिकल कॉलेज सेवाग्राम, लायन्स क्लब चंद्रपूर, तथा गुरुदेव नवयुवक दुर्गा उत्सव मंडळ रत्नापुर यांच्या यांच्या संयुक्त विद्यमाने १७ ऑटोबर २०२३ रोजी विनामूल्य मोतिबिंदू डोळे तपासणी व शस्त्रकिया शिबिर आयोजित करण्यात आले होते.

या शिबिरात ७५० रुग्णांची नोंदणी करून तपासणी करण्यात आली आणि शस्त्रक्रियेकरिता २३० रुग्णाची निवड करण्यात आली. ८० रुग्णांना सेवाग्राम येथे शस्त्रकियेकरिता रवाना करण्यात आले. उर्वरित रुग्णांना टप्पा- टप्याने नेन्यात येणार आहे.

या शिबिराच्या उद्घघाटनाला विशाल सालकर वनपरीक्षेत्र अधिकारी सिंदेवाही, तुषार चव्हाण ठाणेदार सिंदेवहि, डॉ. जाधव सेवा निवृत्त नेत्र चिकित्सा अधिकारी सिंदेवाही, जितेंद्र वैद्य वनरक्षक रत्नापुर, रणधीर मदारे पोलिस सिंदेवाही, रमाकांत लोधे, सभापती कृषी उत्पन्न बाजार समिति सिंदेवाही, संजय गहाणे
उपाध्यक्ष तालुका कांग्रेस कमिटी सिंदेवाही, नरेंद्र गहाणे पोलिस पाटिल रत्नापुर, वामन जीवतोड़े आदी मान्यवर उपस्थित होते.

मान्यवरांच्या हस्ते दुर्गा देवीचे पूजन करून कार्यक्रमाला सुरवात करण्यात आली. या विनामूल्य मोतिबिदु डोळे तपासणी शिबिराचे प्रस्ताविक रमाकांत लोधे, संचालन आणि आभार मंगेश मेश्राम यांनी केले.

शिबिराला लायन्स क्लब चंद्रपूरचे अध्यक्ष विवेक भास्करवार, घनश्यामसिंग दरबार, दिनेश बजाज, यांचे विशेष सहकार्य मिळाले. तसेच सर्व रुग्णानां नेत्रतज्ञ डॉ. अजहर शेख, नेत्र सहायक डॉ. सचिन ताकसांडे आणि सेवाग्राम येथील डॉक्टरांच्या चमूने रुग्णांची तपासणी केली. शिबिराच्या यशस्वीकरीता वासुदेव दडमल, प्रकाश उरकुड़े, अंकुश गहाणे, रंजीत मेश्राम, सुरेश लोधे, टीकाराम कुंभरे, लीलाधर वलके, दिलीप तोडफोडे, कपिल मेश्राम, माणिक गेडाम, गोपाल गहाने, दशरथ बोरकर, पराग चनफने, आणि सर्व सभासदानी सहकार्य केले.





  Print






News - Chandrapur




Related Photos