महत्वाच्या बातम्या

 विद्यार्थ्यांना दिले कौशल्याचे धडे


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : श्री. साईबाबा ग्रामीण विकास संस्थेशी सलग्नित असलेल्या फुले-आंबेडकर कॉलेज ऑफ सोशल वर्क, गडचिरोली येथे अभ्यासक्रमाच्या पूर्ततेच्या अनुषंगाने परिवर्तन बहुउद्देशीय समाज विकास संस्था भटेगाव मार्फत बी.एस.डब्ल्यू भाग-१ आणि एम.एस.डब्ल्यू. भाग-१ या विद्यार्थ्यांना कौशल्याचे धडे देण्यात आले. 

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राध्यापक प्रा. सुरेश कंती व प्रा. हितेश चरडे उपस्थित होते. तसेच कार्यक्रमाला कपिल बांबोळे आणि मिलिंद भैसारे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.

मार्गदर्शकांनी आपल्या जीवनात कौशल्याचे महत्त्व हे वेगवेगळे गटकार्याच्या माध्यमातून समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन शिक्षण घेताना कौशल्याची जाण होणे अतिशय महत्त्वाचे आहे आणि हे आपल्या भविष्याच्या हेतूने खूप महत्त्वपूर्ण ठरणारी बाब आहे. आपल्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये कौशल्य प्रयोगशाळा हा घटक पूर्ण करणे गरजेचे आहे. परंतु आपण शिक्षण घेताना प्रत्यक्षात समुदायात जाऊन काम करत असतो आणि यावेळी समुदायातील वेगवेगळ्या घटकांशी आपला परिचय वेगवेगळ्या घटकांवरती काम करण्याची संधी मिळते. वेगवेगळे उपाययोजना आपल्याला दिसत असतात आणि या उपाययोजनांवर आधारित आपण समस्या हे सोडवण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु या सर्व विषयाचा मुलगा म्हणजे आपण आपल्यामध्ये होणारी कौशल्याची जाणीव करणे हे खूप महत्त्वाचे आहे, असे मार्गदर्शकांनी कलाकृतीच्या माध्यमातून समजावून सांगितले.





  Print






News - Gadchiroli




Related Photos