आचारसंहिता संपली तरी विकासकामांचे फलक झाकलेलेच !


- संबंधित विभागांना पडला  फलक उघडण्याचा विसर 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
विशेष प्रतिनिधी /  अहेरी : 
 लोकसभा निवडणुक लक्षात घेऊन आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होऊ नये म्हणून संबंधित विभागा मार्फत विविध विकास कामाचे फलक पांढऱ्या कापडांनी झाकण्यात आले होते.   लोकसभा सार्वत्रिक निवडणुक  संपून एक महिना होत आहे. परंतु अहेरी शहर व परिसरातील विविध विकास कामाच्या ठिकाणी असलेल्या  फलकावरील पांढरे कापड काढण्याचा विसर संबंधित विभागाला पडल्याचे दिसून येत आहे. 
जिल्हा परिषद,नगरपंचायत व स्थानिक आमदार निधीतून विविध विकास कामे करण्यात आली होती. आचारसंहिता लागु झाल्याने या सर्वच विकास कामाचे फलक पांढरे कापड व कागद लावून झाकण्यात आले होते. पण आचारसंहिता संपून एक महिना पुर्ण व्हायला येत आहे तरी सुध्दा फलकावरील कापड काढण्यात आले नाही. एवढी उदासीनता प्रशासनाची दिसुन येत आहे. 
 लोकसभा निवडणुक संपन्न झाली पण येत्या चार महिण्यात विधानसभा निवडनूका आहेत म्हणून तर विकास कामासाठी लावलेल्या फलकावरील कापड काढण्यात  आली नसतील ना..?  अशी चर्चा अहेरी शहर व परिसरातील लोक करीत आहेत. 

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-06-27


Related Photos