बलात्कार करणाऱ्या आरोपीस ठोठावला कारावास


- चंद्रपूर येथील न्यायालयाचा निकाल
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर :
एकटी असलेल्या महिलेवर शेतात बलात्कार करणाऱ्या  आरोपीस चंद्रपूर येथील प्रमुख सत्र न्यायाधिश दिग्रसकर यांनी कारावास ठोठावला आहे.
शुकलाल झिटू लिलारे (५५) रा. साखरा राजापुर असे शिक्षा ठोठावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. २२ जानेवारी २००२ रोजी सकाळी ९ वाजता फिर्यादी महिला तिच्या राहत्या गावावरून सोनेगाव लोधी येथे कामानिमित्त जात असताना आरोपी शुकलाल याने महिलेला एकटी पाहून शेतातच बलात्कार केला. याप्रकरणी महिलेने शेगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी कलम ३७६ भादंवि नुसार गुन्हा दाखल केला. गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक एस.आर., तत्कालीन ठाणेदारांनी करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. न्यायालयाने सुनावणीदरम्यान साक्षीदार तपासले. आरोपी शुकलाल लिलारे याला ३ वर्ष कारावास आणि एक हजार रूपये दंड अशी शिक्षा ठोठावली आहे. या प्रकरणामध्ये सरकार तर्फे ॲड. प्रशांत घट्टुवार यांनी काम पाहिले.

   Print


News - Chandrapur | Posted : 2019-06-27


Related Photos