ग्राहकांच्या ऑनलाईन खरेदीमुळे व्यापारी अडचणीत , व्यवसाय बंद पडण्याची भीती


- वेळ,पैसा वाचत असल्याचा परीणाम
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रा.प्रमोद मशाखेत्री / मुल : 
शहरासह ग्रामीण भागातील ग्राहकांचा ऑनलाईन खरेदीकडे कल वाढत आहे. या माध्यमातून ग्राहकांचा वेळ आणि पैशाची बचत होत असल्याने यामध्ये  दिवसागणिक वाढ हेात असल्याने यामध्ये दिवसागणिक वाढ होत आहे. त्यामूळे स्थानिक दुकानदारांना मात्र, याचा मोठा फटका बसत असून,व्यवसाय डबघाईस येत  असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
 सध्याचे युग हे विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे आहे. या युगात सर्वत्र तंत्रज्ञानाचा बोलबाला आहे. प्रत्येकाजवळ स्मार्ट फोन,इंटरनेट सेवा पोहोचली आहे. सर्व जगाची माहिती एका क्लिकवर उपलब्ध होत असल्याने नागरिक  हवी ती माहिती सातत्याने घेत आहेत. अनेक ॲप्लिकेशन युजर्सना विविध सुविधा देत असतात. हे सर्व ग्राहकांना सोईस्कर वाटत आहे. विविध कंपन्या  गा्रहकांना घरपोच सुविधा पुरवीत असून, गा्रहकंाना मनासारख्या वस्तू मिळत आहेत. कंपन्या ग्राहकांना हवी ती वस्तू इंटरनेटच्या माध्यमातून ऑर्डर घेऊन कुरिअर किंवा पार्सलने पाठवीत आहेत.  बाजारपेठेच्या तुलनेत वस्तुंच्या किंमतीत बरीच तफावत असल्याने ऑनलाईन  खरेदीकडे ग्राहक जास्त आकर्षित होत आहेत. वस्तू घरपोच मिळत असल्याने ग्राहकांना बाजारात जाऊन वस्तूची शोधाशोध करायचे कामच नाही. ऑनलाईन  खरेदीमुळे इलेक्ट्राॅनिक वस्तू,कपडे,किराणा,साहित्य व मोबाईल ,औषधे आदी वस्तूंनी नेहमी गजबजलेली शहरी व गा्रमीण भागातील दुकानांवरील वर्दळ बरीच  कमी होत चालली आहे. ग्राहकांनी पाठ फिरविल्याने व्यावसायिकांना याचा मोठया प्रमाणात फटका बसत असून त्यांचा उत्पनात घट झाली असल्याचे दिसून येते.  Print


News - Chandrapur | Posted : 2019-06-27


Related Photos