गडचिरोलीत स्कूल बसच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
स्थानिक स्कूल ऑफ स्कालर्सच्या विद्यार्थी घेवून जात असलेल्या बसने दुचाकीस्वाराला दिलेल्या जबर धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना आज २७ जून रोजी सकाळी ७.४५ वाजताच्या सुमारास धानोरा मार्गावरील हिरो शोरूमजवळ घडली.
दिलीप दुर्गे रा. इंदिरानगर असे जखमीचे नाव आहे. दिलीप दुर्गे हे एमएच ३३ एक्स ११७४ क्रमांकाच्या दुचाकीने गडचिरोलीकडे येत होते. तर एमएच २९ एम ८०२६ क्रमांकाची स्कूल बस विद्यार्थी घेवून धानोरा मार्गाने जात होती. दरम्यान दुचाकीला बसची समोरून धडक बसली. यामध्ये दिलीप दुर्गे याचा पाय मोडला असून गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने रूग्णालयात हलविण्यात आले. घटनास्थळी पोलिस उशिरा पोहचल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-06-27


Related Photos