अखेर गोठणगाव धान खरेदी केंद्रावरील 'त्या' मजुराचा मृत्यू


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी /  कुरखेडा :
आदिवासी विकास महामंडळ अंतर्गत  कुरखेडा तालुक्यातील गोठणगाव येथील आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या  माध्यमातून सुरू असलेल्या धान्य  खरेदी  केंद्रावर मजुरी  करणारा  राजकुमार दौलत सिंद्राम  (३३)   रा.  जांभूळखेळा हा गोठणगाव येथे उन्हाळी रब्बी धान्य खरेदी  केंद्रावरा काम करीत  असतांना त्यांची उष्मघातामुळे प्रकृती बिघडली. गावकऱ्यांच्या पुढाकाराने  उपचारासाठी ब्रम्हपुरी आस्था दवाखान्यात दाखल करण्यात आले. सदर मजुरांची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळे गावकरी मंडळीनी  पुढाकार घेवुन  मदत मागितली व उपचार सुरू ठेवला पंरतु  प्रकृती मध्ये सुधारणा झाली नाही आणि आज   २६ जुन रोजी अखेर त्याचे निधन झाले.
आज त्याच्या  स्वगावी अंत्यसंस्कार  करण्यात आले.      यावेळी आविका पदाधिकारी कर्मचारी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष चांगदेव  फाये यांच्या अध्यक्षतेखाली शोकसभा घेण्यात आली.  यावेळी गोठणगाव सोसायटी चे अध्यक्ष यशवंतराव चौरीकर,  जांभुळखेडाचे  सरपंच शिवाजी राऊत , सोसायटी संचालक मोहन कुथे , प्रल्हाद धोंडणे,  खोबरे,  माजी उपसरपंच देवानंद लोहबंरे,  कृष्णाजी पाटणकर,  धर्मा दरवडे सोसायटी संचालक गावातील प्रतिष्ठित नागरिक अंतयात्रेत सहभागी होते. त्याच्या  पश्चात आई,  वडील , पत्नी,  १ मुलगा,  १ मुलगी भाऊ व बराच  मोठा आप्त परिवार आहे.  राजकुमार  हा  घरचा कमावता व्यक्ती  होता.  त्यांच्या निधनाने परिवारावर विविध अडचणी निर्माण झाल्या असुन आदिवासी विकास महामंडळाने सदर कुंटुबाला आर्थिक मदत घ्यावी अशी मागणी आविका पदाधिकारी कर्मचारी संघटना गावकरी व परिवाराने केली आहे.   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-06-26


Related Photos