महत्वाच्या बातम्या

 ई-कुबेरबाबत १९ ऑक्टोबरला प्रशिक्षणाचे आयोजन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा : जिल्हा कोषागार कार्यालय, जिल्हा- भंडारा अंतर्गत (उपकोषागार कार्यालयासह) येणाऱ्या सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांच्या देयकांचे प्रदान सद्य:स्थितीत सिएमपी प्रणाली मार्फत करण्यात येत आहे. परंतु आता हे प्रदान ई-कुबेर प्रणाली मार्फत करण्यात येणार आहे. तत्पूर्वी ई-कुबेर साठी आहरण व संवितरण अधिकारी व कोषागारस्तरावर होणारे बदल व त्यानुषंगाने करावयाची कार्यवाही तसेच राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना याबाबत चर्चासत्र/कार्यशाळा सामाजिक न्याय भवन हॉल, समाजकल्याण कार्यालय, जिल्हा कोषागार कार्यालयाच्या बाजूला, सिव्हील लाईन, भंडारा येथे  गुरूवार १९ ऑकटोबर रोजी आयोजित करण्यात आले आहे.

तरी जिल्हा कोषागार/उपकोषागार अधिनस्त सर्व कार्यालयातून प्रत्येकी दोन (स्वतः आहरण व संवितरण अधिकारी व देयकांशी संबंधित जबाबदार अधिकारी/कर्मचारी) अधिकारी/कर्मचारी यांनी  प्रशिक्षणाला उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी श्रीमती मंगला आर. डोरले यांनी केले आहे.





  Print






News - Bhandara




Related Photos