महत्वाच्या बातम्या

 अधिकारी व कर्मचाऱ्यांनी वाचनाने ज्ञानसंपन्न व्हावे : जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर


- वाचन प्रेरणा दिनी जिल्हाधिकारी कार्यालयात वाचनालयाचे उदघाटन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा : वाचनाने विचारात प्रगल्भता येते.शब्दसाठा वाढतो तसेच ज्ञानात भर पडते.वाचन संस्कृती जोपासण्यासाठी वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात येतो. तरी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी  वाचनालयातील पुस्तकांचा वाचनानंद घ्यावा आणि ज्ञानसंपन्न व्हावे ,अशी अपेक्षा जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी व्यक्त केली. जिल्हाधिकारी कार्यालयात वाचनालयाचे उदघाटन करतांना ते बोलत होते.यावेळी  निवासी उपजिल्हाधिकारी लीना फलके तसेच पक्षी मित्र निसर्ग अभ्यासक किरण पुरंदरे, अनघा पुरंदरे यांच्यासह कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे पदाधिकारी उपस्थित होते.

कुसुमाग्रज प्रतिष्ठान  यांच्याकडून प्राप्त झालेल्या शंभर पुस्तकांसह अन्य पुस्तकांची पाहणी कुंभेजकर यांनी केली. जिल्हा मराठी भाषा समितीच्या सभेत झालेल्या निर्णयानुसार वाचन संस्कृती वृद्धिंगत व्हावी म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयात   वाचनकक्ष निर्माण करावा व संग्रहात उत्तमोत्तम वाचनीय पुस्तकांची भर घालावी असा निर्णय घेण्यात आला.त्यानुषंगाने काल १५ ऑक्टोबर रोजी  या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.





  Print






News - Bhandara




Related Photos