वनरक्षक भरती प्रक्रियेबाबतची तक्रार महापरिक्षेच्या टोल फ्री क्रमांकावर नोंदवावी


- वनविभागाचे आवाहन 

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : वनविभागाच्या वनरक्षक पदाच्या भरती प्रक्रीयेबाबत कोणाची काही तक्रार असल्यास संबंधितांनी तक्रार महापरिक्षेच्या टोल फ्री क्रमांकावर नोंदवावी, अशी माहिती मुख्य वनसंरक्षक गडचिरोली कार्यालयाचे विभागीय वनाधिकारी एस. एल. बिलोलीकर यांनी दिली आहे. 

वनविभागातर्फे संपूर्ण राज्यात ९  जून ते २२  जून   दरम्यान १२८  केद्रांवर उमेदवारांची ऑनलाईन परिक्षा महाआयटी कडून घेण्यात आली होती. या संदर्भात अधिक माहिती किंवा तक्रार नोंदविण्यासाठी महापरिक्षेचा टोल फ्री क्रमांक 180030007766 व enquiry@mahapariksha.gov0in  हया मेलवर संपर्क साधावा असे वनाधिकारी बिलोलीकर यांनी कळविले आहे.  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-06-26


Related Photos