पुलवामामध्ये एका दहशतवाद्याचा खात्मा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / श्रीनगर :
जम्मू-कश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील त्राल येथे हिंदुस्थानचे लष्कर व दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चमकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला आहे. दहशतवाद्याचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला असून अद्याप त्याची ओळख पटलेली नाही. दरम्यान, घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. तसेच अजून काही दहशतवादी या भागात लपल्याची शक्यता असल्याने शोधमोहीम अजूनही सुरू आहे.
त्राल येथील जंगलात दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षा रक्षकांना मिळाली होती. त्यानंतर सुरक्षा दलाचे जवान व ४२ राष्ट्रीय रायफल्सचे जवान यांनी संयुक्तपणे या जंगल परिसरात शोध मोहीम सुरू केली. यावेळी दहशतवाद्यांनी सुरक्षा रक्षकांवर गोळीबार केला असता त्यास जवानांनीही चोख प्रत्युत्तर दिले. यात एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात आले.

   Print


News - World | Posted : 2019-06-26


Related Photos