महत्वाच्या बातम्या

 मॅजिक बस इंडिया फाउंडेशन संस्थेच्या वतीने भेंडाळा येथे स्वयंसेवकांचे दोन दिवसीय प्रशिक्षण संपन्न


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / सावली : १४ ऑक्टोबर २०२३ मॅजिक बस इंडिया फाउंडेशन, संस्थेचे वरिष्ठ जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रशांत लोखंडे यांच्या मार्गदर्शनात गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यात एकूण २३ गाव व ३४ शाळांमध्ये खेळाद्वारे शिक्षण/जिवन कौशल्य विकास हा उपक्रम मागील जवळपास तीन वर्षां पासून राबविण्यात येत आहे.  

सदर उपक्रमाला गाव पातळीवर यशस्वीरित्या राबविण्या करीता गावातील युवा स्वयंसेवक महत्वपूर्ण योगदान देत असतात. त्या करीत स्वयंसेवकांचे दोन दिवसात प्रशिक्षण भेंडाळा येथे आयोजित करण्यात आले. गावातील विविध समस्यांचा शोध घेणे, समस्यांच्या निराकरणा करिता गावातील पदाधिकारी व नागरिकांचे सहकार्य घेणे, गावात विविध सोयी सुविधांची उपलब्धता करण्यास प्रयत्न करणे. इत्यादी विषयावर प्रशिक्षणात सहभागी स्वयंसेवकांना संदीप राऊत जिल्हा प्रशिक्षण अधिकारी मॅजिक बस गडचिरोली व आकाश गेडाम तालुका निरीक्षक चामोर्शी यांनी मार्गदर्शन केले. 

सदर प्रशिक्षण यशस्वीतेसाठी मॅजिक बस संस्थेचे युवा मार्गदर्शक प्रफुल निरूडवार, रोशन तिवाडे, दिपक ढपकस, अस्मिता उराडे, पंकज शंभरकर, अश्विनी उराडे व गावातील समुदाय समन्वयक यांनी अथक परिश्रम घेतले व या प्रशिक्षणात विविध गावातील स्वयंसेवक उपस्थित होते.





  Print






News - Chandrapur




Related Photos