आधुनिक पध्दतीने शेती करा : महेश मतकर


- आलदंडी येथे कृषी व जनजागरण मेळावा
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / पेरमिली :
गडचिरोली जिल्ह्यात निरक्षरता व अंधश्रध्देचे प्रमाण जास्त आहे.  यामुळे शेतकऱ्यांना  संकटांचा सामना करावा लागतो.   आता पारंपाररिक पध्दतीला फाटा देत आधुनिक पध्दतीने शेती करा, असे आवाहन पेरमिली उपपोलिस ठाण्याचे प्रभारी पोलिस अधिकारी महेश मतकर यांनी केले.
पेरमिली येथून २ किमी अंतरावर असलेल्या आलदंडी येथे उपपोलिस ठाण्याच्या वतीने कृषी व जनजागरण मेळावा आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी प्रभारी अधिकारी मतकर अध्यक्षस्थानावरून बोलत होते. 
 कार्यक्रमाचे उद्घाटन पोलिस उपनिरीक्षक पंकज सपकाळ यांच्याहस्ते करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून वाघा अत्राम, रैणु गावडे, सतिश वेलादी, प्रभागर गावडे आदी मान्यवर उपस्थित होते. या मेळाव्यात २५  शेतकऱ्यांना  बियाणे, खते वाटप करण्यात आले.
पुढे बोलताना प्रभारी पोलिस अधिकारी मतकर म्हणाले, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी  शिक्षणात जिद्द व चिकाटी बाळगून जिल्ह्यातील निरक्षरता व अंधश्रध्दा दूर केली पाहिजे. माझ्या दोन वर्षांच्या कार्यकाळात प्रत्येक गावातील शेतकऱ्यांची  स्थिती पहिली असता  चिंताजनक परिस्थिती जाणवली. यामुळे पोलिस विभागाच्या वतीने जमेल तेवढी मदत केली जाणार आहे. परिसरातील महिला खर्रा, तंबाखूच्या आहारी गेल्या आहेत. स्त्री ही शिक्षणाची दोरी आहे. यामुळे व्यसनांपासून दूर राहून महिलांनी शिक्षणाकडे वळावे, असेही ते म्हणाले. कार्यक्रमाचे संचालन सुनिल तोरे यांनी केले आभार रूपेश काळबांधे यांनी मानले. 

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-06-26


Related Photos