आरोग्य व पर्यावरणाच्या संवर्धनासाठी स्वच्छतेचे महत्व जाणुन घ्या : जिल्हाधिकारी सिंह


- घरोघरी शौचालय असणे ही काळाची गरज
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली :
सर्व प्राणीमात्रांच्या आरोग्यासाठी आणि पर्यावरणाच्या संवर्धनासाठी स्वच्छतेचे जीवनात अनन्य साधारण महत्व आहे. तेव्हा कार्यालय असो की घर, तसेच सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता राखावी व त्याचे महत्व जाणुन घ्यावे असे प्रतिपादन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी     केले.
जिल्हा नियोजन भवनातील सभागृहात आयोजित केलेल्या स्वच्छ महाराष्ट्र अभियान अंतर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळेचे उद्घाटन प्रसंगी अध्यक्षीयस्थानावरुन ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर नगरपरिषद कर्जतचे मुख्याधिकारी रमाकांत कोकरे, नगरपरिषद कराडचे मुख्याधिकारी यशवंत डांगे, प्रादेशिक उपसंचालक नागपूर विभागाचे सुधीर शंभरकर, जिल्हा प्रशासन अधिकारी सोमनाथ शेट्टे, विभागीय तांत्रिक तज्ञ, नागपूर, पंकज कटारिया, आदी उपस्थित होते.
 आपला परिसर, घर कशा प्रकारे स्वच्छता राखता येईल याबद्दल मार्गदर्शही केले. प्रत्येक घरामध्ये डस्टबीन ठेवून कचऱ्यांचे विलगीकरण करणे आवश्यक आहे असे त्यांनी सांगितले. ओला कचरा, सुखा कचरा, इलेक्ट्रॉनिक कचरा,  प्लास्टिक  असे वेगवेगळे कचऱ्यांचे कोणत्या रंगाच्या डस्टबीन मध्ये कोणता कचरा गेला पाहिजे याबद्दल नागरिकांना जागरुक करणे आवश्यक आहे असे सांगितले.
नाली बाधतांना  नाल्याचे पाणी कुठे जाईल याचे व्यवस्थापन करावयास हवे. पिण्याचे पाणी असलेल्या स्त्रोतामध्ये नालीचे पाणी जाणार नाही असे मार्गस्थ करावे. रॅकिंग याच्या पलिकडे जाऊन गुणवत्तेवर भर द्यावे. काम चांगले राहिले तर रॅकिंग आपोआपच वाढेल.
 याप्रसंगी प्रादेशिक उपसंचालक नागपूर विभागाचे सुधीर शंभरकर यांनी कचऱ्यांचे व्यवस्थापण कशा प्रकारे करावयास हवे असे सांगितले. तसेच त्याबाबत नगरपरिषद आणि नगरपंचायतींनी काय उपाययोजन करावे याबाबत मार्गदर्शन केले. कचरा हा कुठेही जाळायचा नसून त्यामुळे वायू प्रदुषणात मोठया प्रमाणात वाढ होण्यास प्रतिबंध करण्यास आपणच उपाय निश्चित करावे, असेही त्यांनी सांगितले.
यशवंत डांगे यांनी आपला जिल्हा हा कसा स्वच्छ राहू शकतो याबद्दल सांगितले. अभ्यास सहलींच्या माध्यमातून स्वच्छतेबाबत लोकांमध्ये  जागरुकता निर्माण करता येऊ शकते असे  त्यांनी सांगितले.  कार्यक्रमाला कर्मचारी, पदाधिकारी मोठया संख्येने  उपस्थित होते.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-06-25


Related Photos