वृक्षदिंडीची चंद्रपूर ते गडचिरोलीपर्यंतची वारी, वृक्षदिंडीसोबत निघाली बाइक रॅली


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली :
  आमदार अनिल सोले यांच्या ‘ग्रीन अर्थ ऑर्गनाझेशन च्या माध्यमातून रविवारी निघालेल्या वृक्षदिंडीचा मंगळवारी तिसरा दिवस होता. सोमवारी सेवाग्राम येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी आश्रमाला भेट दिल्यानंतर दिंडी चंद्रपूर येथे पोहोचली. चंद्रपूर वनविभागाद्वारे वृक्षदिंडीचे भव्य स्वागत करण्यात आले.
 मंगळवारी सकाळी वन विभाग आणि सामाजिक वनीकरन विभागाच्या संयुक्तवतीने शहरात दिंडी आणि बाइक रॅली काढण्यात आली. यावेळी वृक्ष पालखीसोबत मोठ्या प्रमाणात नागरिकांनी पायीवारी केली. काही ठिकाणी भजनाद्वारेही जनजागृती करण्यात आली. शहरातून निघालेल्या या वृक्षदिंडी आणि पालखीचे महापौर अंजली घोटेकर, सीइओ कर्दिले, चंद्रपूरचे सीसीएफ एस. व्ही. रामा राव, चंद्रपूरचे डीएफओ अशोक सोनकुसरे आणि जिल्हा दिंडी संयोजक सुभाष कासनगोत्तुवार व मंजूश्री कासनगोत्तुवार, नामदेव डामरे, संजय कांचरलवार, श्याम कानकाम, प्रशांत चौधरी, अंकुश सरसागड़े, राखी कांचरलवार, पुष्पा उराडे, सविता आत्राम, वंदना तीखे, सयाम ताई, हज़ारे ताई, शीला चौहान, सविता कांबळे, प्रज्ञा बांदेवार, अमीन शेख़, धवल चावरे, पुरुषोत्तम सहारे यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वागत करण्यात आले. त्यानंतर वृक्षदिंडी चामोर्शीकडे रवाना झाली. चामोर्शी नगर परिषदेच्या  के प्रांगणात वृक्षारोपण करण्यात आले. दिंडीचे संयोजक आशीष वंदिले आणि सहसंयोजक सुभाष कासनगोत्तुवार यांचे स्वागत नगर पंचायत समितीच्या अध्यक्षा प्रज्ञा बुराडे यांनी केले. सहसंयोजक प्रशांत कामडी यांचे स्वागत सुरवार यांनी केले. तत्पूर्वी, अॅग्रीकल्चर कॉलेजसमोरून गावात वृक्षदिंडीची पायीवारी काढण्यात आली. मुलांचा त्यात मोठ्या प्रमाणात सहभाग होता. गडचिरोलीकडे निघण्यापूर्वी  वृक्षदिंडी मार्कण्डेय स्थित महादेवाच्या मंदिरात नेण्यात आली. मंदिर परिसरात यावेळी वृक्षारोपण करण्यात आले. त्यानंतर चामोर्शीकडे रवाना झाली. 
चामोर्शीचे वन अधिकारी प्रवीण लेले, दिलीप चलख, स्वप्निल वरघड़े, आनंद गणदेरडेवार, जयराम चलख, चंद्रकांत बुराडे, रमेश अधिकारी, केवलरामजी हरडे कॉलेज ऑफ ॲग्रीकल्चर चामोर्शीचे प्राचार्य डॉ. दिनेश सुरजे, सहायक प्राध्यापक श्रीकांत सरदारे, शुभांगी मरसकाले, दामिनी मेश्राम यांच्यासह बीएसी ॲग्रीकल्चरचे दुसऱ्या व तिसऱ्या वर्षाचे विद्यार्थी वृक्षदिंडीत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.  ग्रीन अर्थच्या नेतृत्वाखाली जागोजागी वृक्षारोपण करून वृक्षसंवर्धनाची प्रतिज्ञा घेण्यात आली. 

हा आहे वृक्षदिंडीचा मार्ग

बुधवार, २६ जून, सकाळी ९ वाजता : गडचिरोली, आरमोरी, वडसा, अर्जुनी मोरगाव, नवेगाव, सडक अर्जुंनी, गोरेगाव, गोंदिया येथे मुक्काम.
गुरूवार, २७ जून, सकाळी ९ वाजता : गोंदिया, तिरोडा, तुमसर, कांद्री, रामटेक, मनसर, पारशिवनी, सावनेर, पारडसिंगा येथे मुक्काम.
शुक्रवार, २८ जून, सकाळी ९ वाजता : पारडसिंगा, काटोल, कळमेश्वर, हिंगणा, हिंगणा टी पॉइंट, लक्ष्मीभुवन चौक, कमाल चौक, गोळीबार चौक, डॉ. आंबेडकर चौक, जगनाडे चौक, अशोक चौक, कॉटन मार्केट, रवीभवन येथे मुक्काम.
शनिवार, २९ जून, सकाळी ८ वाजता : सक्करदरा चौक, उमरेड येथे समारोप.    Print


News - Gadchiroli | Posted : 2019-06-25


Related Photos