महत्वाच्या बातम्या

 प्रयत्न केल्यास यश निश्चितच मिळते : खा रामदास तडस


- जिल्हा स्तरीय शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेत देवळी येथील १४ व १९ वर्षीय मुलींचा संघांचा विभागीय स्पर्धेसाठी पात्र

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / वर्धा (देवळी) : शालेय स्तरावर शासनातर्फे क्रिडा प्रकारातील सर्वच खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी तालुकास्तरीय, जिल्हस्तरीय, विभागीय स्तरावर, राज्यस्तरावर स्पर्धेचे आयोजन करण्यात येते, सर्वच क्षेत्रात आत्मविश्वास वाढविण्यासाठी खेळाचा फार मोठा फायदा असल्याने विद्यार्थ्यांनी आपल्याला जो खेळ आवडतो त्यामध्ये सहभाग घ्यावा, ज्याप्रमाणे आपण जिल्हा स्तरीय शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेत आपण जे यश मिळविलेले आहे, ते यश कायम ठेवत विभागीय स्पर्धेत उत्तम खेळ करत प्रतिस्पर्धी संघाला मात देऊन यश संपादन करुन राज्यस्तरीय स्पर्धेकरिता पात्र व्हावे आपले नाव मोठे कराव, तसेच प्रयत्न केला तर अशक्य काहीच नाही त्यामुळे प्रयत्न केल्यास निश्चीतच यश मिळेल असा विश्वास यावेळी खासदार रामदास तडस यांनी व्यक्त केला व सर्व खेळाडुंचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. 

जिल्हा क्रीडा कार्यालय वर्धा व्दारा आयोजीत जिल्हा स्तरीय शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेत देवळी येथील १४ व १९ वर्षीय मुलींचा संघांचा विभागीय स्पर्धेसाठी पात्र झालेले आहेत. दोन्ही विजेता संघाचा देवळी येथेील जनसंपर्क कार्यालयात खा. रामदास तडस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी य प्रशिक्षक कुणाल हिवसे, सुरेंद्र गांडोले, संकेत वरके, मोनुसिंह काकन, सागर इंगोले उपस्थित होते.

जिल्हा स्तरीय शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेत देवळीच्या १४ वर्षीय मुली व्हॉलीबॉल संघात यशस्वी जगदीश झाड, धनश्री नितीन बरडे, ऋतुजा किशोर लोखंडे, अक्षरा नितीन बरडे, उन्नती उदय कोकाटे, पायल चंद्रशेखर पुंड व १९ वर्षीय मुलीमध्ये भूमी प्रवीण रिठे, नेहा संजय घोडे, पूर्वा विजय भोयर, संतोषी संजय कैकाडी, वैष्णवी विकास भोयर, कृष्णाई सुभाष गोमासे, पायल गणेश नखाते यांचा समावेश आहे.  मुलींनी आपल्या यशाचे श्रेय प्रशिक्षक कुणाल हिवसे, सुरेंद्र गांडोले, संकेत वरके, मोनुसिंह काकन, सागर इंगोले व टि.टी.सी. स्पोर्टींग क्लबला दिले.





  Print






News - Wardha




Related Photos