महत्वाच्या बातम्या

 दवंडी येथील हत्याकांडाचा गुन्हा गडचिरोली पोलीस दलाने केला उघड


- पत्नीनेच केली प्रियकराच्या मदतीने स्वत:च्या पतीची हत्या
- गुन्ह्रातील तीनही आरोपी पोलीसांच्या ताब्यात

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : बेडगाव पासुन ६ कि. मी. अंतरावर असलेल्या दवंडी या गावी राहणारा किराणा दुकानदार लखन सुन्हेर सोनार (वय ३८) वर्ष, याची अनोळखी ५ ते ६ काळे कपडे परिधान केलेल्या इसमांनी घरात घुसुन त्याच्या पत्नी समोर धारदार शस्त्राने हत्या केल्याची तक्रार पोलीस मदत केंद्र, बेडगाव येथे प्राप्त झाली.

प्राप्त तक्रारीच्या आधारे पोलीस स्टेशन कोरची येथे अप क्र. ९९/२०२३ कलम ३०२, ३४ भादवी अन्वये १२ ऑक्टोबर २०२३ रोजीचे २१:२५ वा. अज्ञात आरोपीतांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस स्टेशन कोरची येथील पोलीस निरिक्षक फडतरे व पोमकें बेडगावचे प्रभारी पोउपनि विठ्ठल सुर्यवंशी यांनी गोपनीय यंत्रणा तयार करुन सतर्क करत गावातील रहिवासी, नातेवाईक यांचेकडे सखोल चौकशी केली असता, मयताची पत्नी सरिता लखन सोनार रा. दवंडी हीचे दवंडी येथील सुभाष हरिराम नंदेश्वर या इसमासोबत अनैतिक संंबंध असल्याच्या कारणावरुन पती लखन यांच्यामध्ये नेहमीच वाद होत असल्याची माहिती मिळाली. याच माहितीच्या आधारे तपासाची दिशा ठरवत मयताच्या पत्नीकडे अधिक विचारपुस करण्यात आली. सुरुवातीला तिच्याकडुन उडवाऊडवीची उत्तरे देण्यात आली. त्यानंतर तिला विश्वासात घेऊन विचारपुस केली असता, तिने प्रियकर व त्याच्या साथीदाराच्या मदतीने गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले आहे. 

मय्यत लखन हा पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन नेहमी भांडण करत होता व तिचा शारीरिक मानसिक छळ करीता होता. या त्रासाला कंटाळुन आरोपी मय्यताची पत्नी सरिता हिने तिचा प्रियकर सुभाष नंदेश्वर याला सर्व हकिकत सांगत पतीचा काटा काढावा या करीता तगादा लावला. त्यांनतर ०९ ऑक्टोबर २०२३ रोजी लखन सोनार याच्या हत्येचा कट रचुन हत्येची जबाबदारी बळीराम गावडे रा. कुकडेल यांचेकडे देण्यात आली.

नियोजीत ११ ऑक्टोबर २०२३ चे रात्री अंदाजे १०.४५ वा. मारेकरी बळीराम गावडे याने मय्यताची पत्नी सरिता हिच्या मदतीने घरात प्रवेश केला व धारदार शस्त्राने लखन सोनार याची निर्घृण हत्या करुन निघुन गेला.
सदर घटनेतील सर्व कबुली मयताची पत्नी सरिता हिने दिलेली असुन गुन्ह्रातील सर्व आरोपी १) सरिता लखन सोनार, २) सुभाष हरिराम नंदेश्वर दोघेही रा. दवंडी व ३) बळीराम गावडे रा. कुकडेल यांना ताब्यात घेण्यात आले आहे.  

सदर घटनेचा पुढील तपास पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी कुरखेडा साहील झरकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस मदत केंद्र, बेडगाव चे प्रभारी अधिकारी पोउपनि विठ्ठल सुर्यवंशी हे करीत आहेत.





  Print






News - Gadchiroli




Related Photos