महत्वाच्या बातम्या

  गोंडवाना विद्यापीठात मानव तस्करी विरोधात मूक रॅलीचे आयोजन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : महाराष्ट्र शासन परिपत्रक प्रमाणे गोंडवाना विद्यापीठ व व्हीजन रेसकू संस्था, मुंबई यांच्या संयुक्त सहकार्यातून आज फ्रीडम वॉक मुक रॅली चे आयोजन करण्यात आले. यामध्ये विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा योजना तसेच इतरही विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने भाग घेतला. ही रॅली सकाळी ७ वाजता विद्यापीठ परिसर ते जिल्हा न्यायालय परिसरापर्यंत काढण्यात आली. नंतर जिल्हा व सत्र न्यायाधीश आर.आर पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आणि मानवी तस्करी कशा स्वरूपात आज समाजात घडत आहे, त्याबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. 

त्यांनी होत असलेल्या विविध प्रकारच्या व विविध हेतूच्या मानव तस्करीच्या घटना सांगत या सामाजिक ज्वलंत प्रश्नांविषयाची जाणीव ठेऊन कठोर पाऊले उचलण्याची गरज समजाऊन सांगितली. त्यांनी सर्व उपस्थित विद्यार्थी आणि कर्मचारी यांना मानव तस्करी विरोधात योगदान देण्यासाठी शपथ दिली. या प्रसंगी व्हीजन रेसकू संस्था, मुंबई यांच्या वतीने तुलना देवगडे, गोंडवाना विद्यापीठाचे रा. से यो संचालक, डॉ. श्याम खंडारे, कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रमोद आर. जावरे व शहरातील विविध महाविद्यालयातील इतरही कार्यक्रम अधिकारी उपस्थित होते. ही रॅली गडचिरोली शहरातील वेगवेगळ्या महाविद्यालयांसोबत एकरूप होऊन जिल्हा न्यायालय परिसर येथून आयटीआय चौक व नंतर पुढे एलआयसी चौक मार्गे परतीच्या दिशेने पोलिस संकुल जवळून जिल्हा न्यायालय परिसर येथे येऊन थांबली व न्यायालय परिसरात रॅलीची सांगता झाली.





  Print






News - Gadchiroli




Related Photos