शेकडो डी.एड. धारक बेरोजगारांची आश्रमशाळा कंत्राटी शिक्षकांच्या मुलाखतीसाठी हजेरी


-  जिल्ह्यातील तसेच इतर जिल्ह्यातूनही आले उमेदवार 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी/ गडचिरोली :
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पातील कंत्राटी शिक्षकांच्या १४३ जागांकरिता गडचिरोली येथील पोटेगाव मार्गावरील मुलांच्या  शासकीय वस्तीगृहामध्ये आज २५ जून ला  मुलाखत घेण्यात येत आहे.  या मुलखतीला सकाळपासून  जिल्ह्यातील तसेच इतर जिल्ह्यातील डीटीएड धारक बेरोजगार  आपल्या आशा अपेक्षा घेऊन उपस्थित झाले आहेत.
 उन्हातान्हात, झाडाच्या आडोशाला थांबून विद्यार्थी मुलाखतीच्या प्रतीक्षेत आहेत.  परंतु या मुलाखतीकरिता वयाची तसेच स्थनिक पातळीवरील उमेदवारच हवा अशी  कोणतीही अट  ठेवण्यात आली नसल्याने विद्यार्थी संभ्रमात  आहेत.  अमरावती , यवतमाळ जिल्ह्यातूनही उमेदवार या ठिकाणी मुलाखत देण्याकरिता आलेले आहेत . त्यामुळे  निवड ही कोणत्या पात्रतेनुसार होणार याबाबत उमेदवारांमध्ये शंका उपस्थित झाली आहे. 
जिल्ह्यातील आश्रमशाळांमध्ये शिक्षकांच्या मोठ्या प्रमाणात जागा रिक्त आहेत. यामुळे आदिवासी विकास विभागा मार्फत दरवर्षी कंत्राटी तत्वावर शिक्षकांची नियुक्ती करण्यात येते. तासिका तत्वावर नियुक्ती असूनही रोजगार नसल्यामुळे बाहेर जिल्ह्यातिलही उमेदवार कंत्राटी तत्वावर शिकविण्याची संधी मिळेल या आशेने गडचिरोलीत दाखल झाले आहेत.   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-06-25


Related Photos