उपचाराच्या बहाण्याने बाहेरगावी नेऊन सासऱ्याच्या सुनेवर बलात्कार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी /  नागपूर : 
महिलेला कावीळ  झाल्याने  तिला उपचाराच्या बहाण्याने बाहेरगावी नेऊन परत येताना  सासऱ्याने सुनेवर शेतात   बलात्कार केल्याची  घटना   रविवारी उघडकीस आली. विशेष महिला दोन महिन्यापूर्वी घरी सून म्हणून आली होती. 
सुनेला कावीळची लागण झाली. एकाने जवळच्या गावात एक वैद्य उत्तम उपचार करीत असल्याचे सांगितले. त्यानुसार आरोपीने १४ जून रोजी  सुनेला सोबत घेऊन वैद्याचे गाव गाठले. मात्र, त्याची भेट झाली नाही. परत येताना   सुनेला शेतावर नेले. आणि झोपडीत तिच्यावर बलात्कार केला. कोणाला सांगितले तर जीवे मारण्यात येईल, अशी धमकी दिली. सुनेने या घटनेची वाच्यता केली नाही.
१६ जून रोजी घरात कुणी नसल्याचे बघत  पुन्हा सुनेवर बलात्कार केला. त्यानंतर तिने हा प्रसंग तिच्या बहिणीला सांगितला. त्यानंतर तिच्या आई-वडिलांसह इतर मंडळींनी घरी बैठक घेऊन हा प्रकार योग्य नसल्याचे सांगितले. मात्र, कोणीच विश्वास ठेवला नाही. त्यामुळे सुनेच्या आई-वडिलांनी पोलीस  ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.  Print


News - Nagpur | Posted : 2019-06-25


Related Photos