महत्वाच्या बातम्या

 ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांचा उद्या भंडारा जिल्हा दौरा कार्यक्रम  


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / भंडारा : राज्याचे  दिव्यांग  मंत्रालयाचे प्रमुख अध्यक्ष (मंत्री दर्जा) ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू हे उद्या १४ ऑक्टोबर २०२३ रोजी भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा पुढील प्रमाणे आहे.  सकाळी ७ वाजता अमरावती येथून भंडाराकडे प्रयाण व सकाळी १० वाजता चैतन्य पोलीस ग्राऊंड येथे आयोजित दिव्यांग कल्याण अभियान कार्यक्रमला उपस्थित राहतील.

त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात दुपारी ३.३० वाजता दिव्यांगासंबंधित योजनांचा आढावा घेतील. सायंकाळी ५ वाजता सुरेवाडा पुनर्वसन येथे कार्यक्रमाला उपस्थित राहून  सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास भंडारा येथून नागपूरकडे कडे  प्रयाण करतील.





  Print






News - Bhandara




Related Photos