अनखोडा - जैरामपूर मार्ग खड्ड्यांनी जर्जर, रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / आष्टी :
चामोर्शी तालुक्यातील अनखोडा - जैरामपूर मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून आता थोड्याशाही पावसामुळे चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. असे असतानाही या मार्गाच्या दुरूस्तीकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दूर्लक्ष होत आहे.
आष्टी - अनखेडा - जैरामपूर - गणपूर - भेंडाळा या मार्गाने दररोजच वाहनांची वर्दळ सुरू असते. राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसचेही दिवसभर आवागमन सुरू असते. जड वाहनेही मोठ्या प्रमाणात ये - जा करतात. यामुळे रस्त्यावर मागील दोन वर्षांपासून मोठमोठे खड्डे पडले आहेत. या मार्गाची दुरूस्ती करणे अत्यावश्यक असतानाही याकडे दूर्लक्ष केले जात आहे. आता पावसाळ्याचे दिवस सुरू होत असल्यामुळे थोड्याही पावसात रस्ता चिखलमय होत आहे. खड्डे दिसून येत नाहीत. यामुळे वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे. अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे तातडीने रस्त्याची दुरूस्ती करावी, अशी मागणी केली जात आहे.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-06-24


Related Photos