मान्सूनच्या आगमनाअभावी चिचडोह बॅरेज चा दरवाजे उघडण्याचा कार्यक्रम लांबला


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली :
चिचडोह बॅरेज प्रकल्पाचे ३८ दरवाजे १५  जून  रोजी  उघडण्याचे नियोजित करण्यात आले होते. परंतु अद्याप मान्सुन चे आगमन झाले  नाही व पाण्याची टंचाई लक्षात घेता बॅरेज मध्ये साठवलेले पाणी क्रमाक्रमाने कमी करुन पावसाच्या  परिस्थितीनुसार सर्व ३८ दरवाजे उघडण्या येतील असे लघु पाटबंधारे विभागाच्या वतीने कळविण्यात आले आहे.
  बॅरेज च्या खालील भागातील पाण्याची अडचण लक्षात घेवून बॅरेजमधुन सध्या २ रिव्हर स्लुईस ०.५०  मीटरने उघडले  असुन ९.४०  Cusec  पाण्याचा विसर्ग दररोज सुरु आहे.  २१ जून  पासुन आणखी २ रिव्हर स्लुईस ०.५०  मीटरने उघडण्यात येत असून एकूण १८.८० Cusec विसर्ग दररोज सोडण्यात येत असल्याची माहिती  लघु पाटबंधारे विभाग चंद्रपूर  चे उपकार्यकारी अभियंता यांनी दिली आहे.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-06-24


Related Photos