महत्वाच्या बातम्या

 २० ऑक्टोबर रोजी सैनिक दरबारचे आयोजन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : जिल्ह्यातील सेवारत व माजी सैनिकांच्या तसेच त्यांच्या अवलंबितांच्या जिल्ह्यातील विविध विभागात प्रलंबित असलेल्या व वैयक्तिक तक्रारींचे निवारण करण्यासाठी सैनिक दरबारचे आयोजन करण्यात आले आहे. या सैनिक दरबारमध्ये जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या उपस्थित तक्रारीचे निवारण करण्यात येणार आहे. त्यामुळे सेवारत व माजी सैनिक तसेच अवलंबितांना काही समस्या व अडचणी असल्यास कागदपत्रासह उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

२० ऑक्टोंबर रोजी सकाळी १०.३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित सैनिक दरबारमध्ये सेवारत व माजी सैनिक तसेच अवलंबितांना अडचणी किंवा समस्या असल्यास १७ ऑक्टोंबर पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय येथे कागदपत्रासह दोन प्रति अर्ज सादर करुन टोकन प्राप्त करुन घ्यावे. तक्रारी वैयक्तिक स्वरुपाच्या असाव्यात. मागण्या करणारी प्रकरणे, मोघम स्वरुपाच्या तक्रारी तसेच न्यायप्रविष्ठ, न्यायालयात तसेच लोकशाही दिनात निकाली निघालेली प्रकरणे स्विकारण्यात येणार नाही, असे जिल्हा सैनिक अधिकारी फ्ला. धनंजय सदाफळ यांनी कळविले आहे.





  Print






News - Wardha




Related Photos