१७ रुपयांच्या अपहार भोवला , रापम च्या वाहकाला कामावरून कमी करण्याचे आदेश


वृत्तसंस्था / मुंबई :  पैशांचा अपहार करणार्‍या एसटी वाहकाला मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठाने चांगलाच दणका दिला. १७ रुपयांच्या अपहारप्रकरणी वाहकाला कामावरून कमी करण्याचे आदेश न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांनी दिले आहेत. एवढेच नव्हे तर कर्मचार्‍याबद्दल सहानुभूती दाखवत त्याला कामावर पुन्हा रुजू करून घेण्याचे आदेश देणार्‍या कामगार न्यायालयालाही हायकोर्टाने फटकारले आहे.
१९९४ साली सिन्नर ते शहादा असा प्रवास करणार्‍या दोघा प्रवाशांकडून तिकिटाचे पैसे घेऊन त्यांना तिकीट न देताच १७ रुपयांचा अपहार करणार्‍या तिकीट कंडक्टरला पकडण्यात आले. त्यानंतर या तिकीट कंडक्टरला प्रशासनाच्या वतीने कामावरून कमी करण्यात आले. याविरोधात वाहकाने कामगार न्यायालयात धाव घेतली. कामगार न्यायालयाने त्याला सहानुभूती दाखवत दिलासा दिला. तसेच कामावर पुन्हा ठेवण्याचे आदेश दिले. कामगार न्यायालयाच्या या निर्णयाला एसटी प्रशासनाने औद्योगिक कोर्टात आव्हान दिले, परंतु औद्योगिक कोर्टाने कर्मचार्‍याच्या बाजूने निकाल दिल्याने एसटी प्रशासनाने हायकोर्टात धाव घेऊन या निर्णयाला आव्हान दिले. मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठासमोर याप्रकरणी सुनावणी घेण्यात आली.   Print


News - Rajy | Posted : 2019-06-23


Related Photos