योग गुरू रामदेव बाबा लिहणार लवकरच आत्मचरित्र


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / नवी दिल्ली :
तेल ,साबण, शॅम्पू, डाळी, कडधान्यानंतर वस्त्रोद्योगात भरारी घेणारे योग गुरू रामदेव बाबा लवकरच आत्मचरित्र लिहणार आहेत. ‘माय लाईफ माय मिशन’ असे या आत्मचरित्राचे नाव आहे. यात बाबा त्यांच्या आयुष्याच्या प्रवासाबद्दल सांगणार आहेत. ज्येष्ठ पत्रकार उदय माहुरकर हे या आत्मरित्राचे सहलेखन करणार आहेत.
पैंगुईन रॅंडम हाऊस हे प्रकाशक बाबांचे आत्मचरित्र प्रकाशित करणार आहेत. ऑगस्टमध्ये हे आत्मचरित्र बाजारात उपलब्ध होण्याची शक्यता आहे. आत्मचरित्र लिहीत असल्याची घोषणा बाबांनी टि्वटरवर दिली आहे. अनेक व्यक्तींनी माझ्याबद्दल बरच काही लिहलयं. पण आता मीच माझी जीवन कहाणी माझ्याच शब्दात घेऊन येत आहे. त्याची प्रत मिळवण्यासाठी आताच ऑर्डर करायला विसरू नका असे बाबांनी टि्वटमध्ये म्हटले आहे. हरयाणातील एका छोट्या गावापासून ते आंतरराष्ट्रीय मंचापर्यंतचा बाबा रामदेव यांचा प्रवास यात वाचकांना वाचायला मिळणार आहे. तसेच योगाबरोबरच प्रकृती कशी सांभाळावी हे देखील त्यांनी यात नमूद केले आहे. आपले शत्रु आणि मित्र यांच्याबद्दलही बाबांनी आत्मचरित्रात मनमोकळेपणे लिहले आहे. त्याचबरोबर स्वदेशी व पतंजलीच्या व्यवसायाबद्दलही बाबांनी यात आपले अनुभव कथन केले आहे. दरम्यान, बाबांच्या आत्मचरित्राचे लेखन करायला मिळणे हा माझ्या जीवनातील महत्वाचा अनुभव आहे. असे माहुरकर यांनी म्हटले आहे.

   Print


News - World | Posted : 2019-06-23


Related Photos